आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 वर्षांचा चिमुरडा 32 वर्षांच्या महिलेला पाहून म्हणतो ही माझी बायको आहे, धक्कादायक आहे सत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणा - मृत्यूनंतर शरिरातील आत्म्याचे नेमके काय होते, याबाबत कोणीही आजवर काहीही ठोस सांगू शकलेले नाही. अनेक लोक पुनर्जन्मावर विशावस ठेवतात. त्यामुळे व्यक्तीचा पुनर्जन्म होतो असे त्यांचे म्हणणे असते. अनेकदा पुनर्जन्माच्या विविध घटनाही ऐकायला मिळत असतात. आपणही आज अशीच घटना जाणून घेणार आहोत. तुम्हालाही हे ऐकूण धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 


हरियाणाच्या जिंदमध्ये जलालपूर नावाचे एक गाव आहे. याठिकाणी एका 4 वर्षांच्या चिमुरड्याने त्याच्या  पुनर्जन्माबाबत असे काही सांगितले की, सर्वच ते ऐकूण चकित झाले. विनोद आणि मसिंद यांच्या घरी चार वर्षांपूर्वी हे बाळ जन्माला आले. त्यांनी मुलाचे नाव ठेवले लविश. 


लविशच्या आई-वडिलांनी सांगितले की, अडीच वर्षांचा असल्यापासून तो रामराई जिंद जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेल्या हंसी रोडवर आठ किलोमीटरवर असलेल्या एका गावात जाण्याची जिद्द करायचा. अखेर एकदा विनोद त्याला त्या गावात घेऊन गेले. त्याठिकाणी त्याने मागच्या जन्मातील त्याचे कुटुंब आणि शेजाऱ्यांना ओळखले. विशेष म्हणजे तो सर्वांना घेऊन त्या ठिकाणीही गेला ज्याठिकाणी करंट लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. हे सर्व पाहून त्याची मागच्या जन्मातील (32 वर्षीय) पत्नी हंबरडा फोडून रडू लागली. 


यागावातील ज्योती स्वरुप  यांच्या मुलाचे नाव संदीप होते. 26 जुलै 2004 रोजी संदीप याचा करंट लागल्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे या घटनेनंतर पुर्जन्मावर विश्वास असलेल्या लोकांना धक्का बसला आहे. या परिसरात सध्या याचीच चर्चा आहे. 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...