आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअलवर(राजस्थान)- शहरात किरायाच्या घरात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 4 मित्रांनी नोकरी मिळत नसल्याने ट्रेनसमोर उडी घेतली. या घटनेत त्या चारपैकी मनोज मीणा(24), सत्यनारायण ऊर्फ ड्युटी मीणा(22), रितुराज ऊर्फ ऋषि मीणा(17) या तिघांचा चेंदामेंदा झाला. तर अभिषेक मीणा(22) याला गंभीर दुखापत झाली आहे. हे चारही मित्र राजगढ़-रैणी परिसरात राहत होते. ही घटना अलवर-जयपूर रेल्वे ट्रॅकवर घडली. या सामूहिक आत्महत्येसाठी 6 तरुण रेल्वे ट्रॅकवर गेले होते, त्यापैकी चैैाघांनी उडी घेतली, तर दोघे घाबरून पळून गेले.
राहुलने सांगितली संपूर्ण घटना
या घटनेतुन वाचलेल्या राहुल मीणाने सांगितले, ''संध्याकाळी 6.30 वाजता माझ्या मोबाईलवर सत्यनारायणचा फोन आला. त्याने मला शांतिकुंजच्या जवळच्या रेल्वे ट्रॅकवर बोलवले. तिथे गेल्यावर पाहिले की, सत्यनारायण, मनोज, रितुराज, अभिषेक व संतोष मीणा आधीच येउन बसले होते. मला सत्यनारायण म्हणाला- या आयुष्याचा आता कंटाळा आलाय, आपण ना तर शेती करू शकतो आणि ना आपल्याला नोकरी मिळत आहे. तु सांग आता काय करायच.? आम्ही तर मरणारच. मी त्याला म्हणालो- मस्करी नको करू यार, आणि त्यांना समजुन सांगून रेल्वे ट्रकवरून हटवले. त्यानंतर आम्ही सगळे दुसऱ्या ट्रॅकवर जाउन बसलोत. त्यानंतर आम्ही मस्त एंजॉय करु लागलो. काही वेळानंतर मनोज, रितुराज आणि अभिषेक बाजुला जाउन फोनवर बोलत बसले. मी आणि संतोष तिथेच बसलो होतो. त्यावेळी एक ट्रेन आली आणि सत्यनारायण, मनोज, रितुराज आणि अभिषेकने एकसोबतच ट्रेन समोर उड्या घेतल्या. त्यात त्यांच्या चिंधड्या उडाल्या. ते भयानक दृश्य पाहून मी आणि संतोष घाबरून गेलोत. त्यानंतर मी आभिषेकच्या भावाला सगळी घटना सांगितली. आम्ही दोघे गाडीवरून रेल्वे स्टेशनवर गेलोत आणि आरपीएफ ठाण्यात घटनेची माहिती दिली, आणि मित्रांसोबत ट्रॅकवर जाऊन त्या तिघांना शोधु लागलो तेव्हा आम्हाला तीघांचे मृतदेह मिळाले आणि आभिषेक जखमी अवस्थेत मिळाला. त्यानंतर आम्ही पोलिस कंट्रोल रूमला घटनेची माहीती दिली.
रात्री 11.30 ला पोलिसांना मिळाली सुचना
पोलिसांना या घटनेची माहीती मंगळवारी रात्री 11.30 ला मिळाली. त्यांनी त्या तिघांच्या मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवले. तर जखमी आभिषेकला खासगी रूग्णलयात भर्ती करण्यात आले आहे.
50 फुटापर्यंत मिळाले मृतदेहाचे तुकडे
पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळी गेलो तेव्हा खुप अंधार झालेला होता त्यामुळे त्यांचे मृतदेह शोधन्यात खुप वेळ लागला. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे 50 फुट दुरवर उडाले होते.
डॉक्टरांनी सांगितले- डिप्रेशनमध्ये आल्यावर मनात सुसाइडची भावना येते
राजीव गांधी रूग्णालयाच्या साइक्लॉजिस्ट डॉ. निहारिका सैनी यांनी सांगितले की, डिप्रेशनमध्ये आल्यावर अशा प्रकारची भावना मनात निर्माण होते. जेव्हा आपण नकारात्मक विचार करू लागतो तेव्हा मनात त्या प्रकारची भावना उत्पन्न होते.
उपाय : जर आपण डिप्रेशनमध्ये असाल तर डॅाक्टरांकडे जाऊन उपचार घेतला पाहीजे. त्याबरोबरच आपण नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे. एकटे राहणे टाळले पाहीजे. स्वत:ला कामात गुंतवूण ठेवले पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.