आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभेजा शिवारातील 40 एकर ऊस जळून खाक; 9 शेतकऱ्यांचा ऊस पडला आगीच्या भक्ष्यस्थानी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परंडा- तालुक्यातील कुंभेजा शिवारात अचानक लागलेल्या आगीत ९ शेतकऱ्यांचा ३० ते ४० एकर ऊस जळून खाक झाला. ही घटना शनिवारी (दि.१२) दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान कारखान्याने तत्काळ ऊस तोडणी कामगार टोळी पाठवून ऊस तोडणी सुरू केली. 

 

कुंभेजा येथील अर्जुन कोकाटे, भास्कर कोकाटे, अंबादास कोकाटे, उध्दव कोकाटे, मिस्कीन, रवींद्र वाडेकर, कौशल्या हांडगे, पांडुरंग कोकटे, अरविंद पोपळे आदी ९ शेतकऱ्यांचा ३० ते ४० एकर लगत असलेला व तोडणीला आलेला ऊस अचानक लागलेल्या आगीमध्ये जळुन खाक झाला. ही आग आटोक्यात आणण्यासाठी भैरवनाथ शुगर वर्क्सचा अग्निशामक बंब दाखल झाला. त्यानंतर आग आटोक्यात आली. जळालेला उसाच्या ठिकाणी भैरवनाथ शुगर वर्क्स सोनारी, इंद्रेश्वर साखर कारखाना उपळाई, बबनराव शिंदे साखर कारखाना केवड तसेच बाणगंगा सहकारी साखर कारखाना इडा अंतरगाव ऊस तोडणी टोळी तत्काळ पाठवून तोडणी सुरू केली आहे. मात्र यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...