आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कमी वयात महिला घेऊ शकत नाही सेक्सचा आनंद'- 40 वर्षांच्या अभिनेत्रीने शेअर केली मनातील गोष्ट, म्हणाली 20 वर्षांची असताना स्वप्नांची चिंता होती, 30 मध्ये स्वतःला ओळखले पण आता जगते बिंदास आयुष्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. विद्या बालनची एक मुलाखत सोशल मीडियावर खुप ट्रेंड करतेय. यामध्ये विद्या महिलांच्या वयाविषयी बोलली आहे. यावर्षी विद्याने 1 जानेवारीला आपला 40 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत विद्या बरेच काही बोलली. विद्या म्हणते की, महिला या वयानंतर खुप खोडकर होतात. या वयात महिला जास्त चिंता करत नाही आणि पहिल्यापेक्षा खास पध्दतीने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात. यासोबतच विद्या बालन म्हणाली की, 40 नंतर महिला हॉट होतात. मुलाखतीत विद्या म्हणते की, "हो मी मानते की, वयाच्या चाळीशीनंतर महिला खोडकर आणि हॉट होतात. सामान्यतः या वयाच्यापुर्वी महिला खुप लाज-या असतात आणि सेक्सचा आनंद घेऊ शकत नाही. पण वयाच्या चाळीशीनंतर त्या एकदम बिंदास होऊन आयुष्य जगतात."


20 वर्षांच्या असताना विद्याला होती ही काळजी 
- "जेव्हा मी 20 वर्षांची होती, तेव्हा मी माझ्या स्वप्नांमुळे टेंशनमध्ये होते. 30 वर्षांची झाले तेव्हा स्वतःला ओळखले. 40 नंतर मी माझ्या आयुष्यावर खुप प्रेम करु लागले आहे. जर तुम्ही चिंता केली तर आयुष्य जगण्यासाठी जास्त क्षण उरत नाही. मी आयुष्यात मागे जाण्याचा प्रयत्न करते. सर्व गोष्टींविषयी गंभीर होण्याचा प्रयत्न करते. पण सर्व काही विसरुन मी आपल्या आयुष्याचा आनंद घेते. मी माझ्या खांद्यावर आयुष्यातील कोणताच भार घेत नाही." विद्या लवकरच अक्षय कुमारच्या 'मिशन मंगल' चित्रपटात दिसणार आहे. 


लठ्ठपणाविषयी बोलली विद्या 
- विद्या या मुलाखतीत आपल्या लठ्ठपणाविषयीही बोलली. विद्या म्हणाली, "मला आयुष्यभर हार्मोनल प्रॉब्लम्स राहिल्या आहेत. यामुळेच मी काही निर्णय माझ्या शरीरासाठी घेतले आहेत. मी टीनेजर होती, तेव्हा मला लोक म्हणायचे की, तुझा चेहरा एवढा सुंदर आहे, तु थोडे वजन का कमी करत नाही? असे बोलणे चुकीचे आहे. मग तो लहान मुलगा असो किंवा वयस्कर"
- विद्या म्हणाली, "मी स्वतःला उपाशी मरणे सुरु केले. मी वजन कमी करण्यासाठी खुप कठोर आणि घाम गाळणारे व्यायाम केले. हार्मोनल समस्या काही दिवसांसाठी ठिक होत होत्या. पण पुन्हा सुरु व्हायच्या. वजन कमी होणे, मग पुन्हा वाढणे हे सुरुच असायचे. असाच पॅटर्न सुरु होता."
- "अनेक वर्षांपुर्वी मी माझे शॉट्सही पाहणे बंद केले होते. कारण मी मॉनीटरवर बघायचे तेव्हा मला वाटायचे की, मी किती लठ्ठ दिसतेय? जेव्हा लोक व्यायाम करण्याचा सल्ला देतात, तेव्हा वाटते की, त्यांना म्हणावे, 'भाड़ में जाओ' तुम्हाला कसे माहिती की, मी व्यायाम करत नाही. मी कोणत्या हद्दीपर्यंत मेहनत करते याविषयी तुम्हाला माहिती तरी आहे का. समोरच्या कोणत्या अडचणींचा सामना करतोय याची तुम्हाला जाणिव आहे का."

बातम्या आणखी आहेत...