• Home
  • National
  • 40 prison officers and employees of the country announce corrective service medals for outstanding work, including three in Maharashtra

National / देशातील 40 तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कार्यासाठी सुधारात्मक सेवा पदक जाहीर, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश

सुधारात्मक सेवा पदकास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली 

दिव्य मराठी

Aug 14,2019 05:29:00 PM IST

नवी दिल्ली- देशातील 40 तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कार्यासाठी आज सुधारात्मक सेवा पदक जाहीर करण्यात आले. तुरुंगसेवेत कैद्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या उपक्रमाबद्दल सेवा पदक प्रदान करण्यात येतात. यात महाराष्ट्रातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.


स्वांतत्र्य दिनानिमित्त आज केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सुधारात्मक सेवा पदकास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. तुरुंगसेवेत कैद्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या उपक्रमाबद्दल सेवा पदक प्रदान करण्यात येतात. प्रतिष्ठित सेवेसाठी देशातील तीन तुरुंग अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातून सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे सुभेदार शकील शेख यांना हे मानाचे सुधारात्मक सेवा पदक जाहीर झाले आहे.


याशिवाय, देशातील 37 तुरुंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील दोघा कर्मचाऱ्यांना समावेश आहे. भायखळा जिल्हा कारागृहाचे शिपाई जितेंद्र काटे आणि कल्याण जिल्हा कारागृहाचे सिपाई अशोक ठाकूर यांना उल्लेखनीय सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक जाहीर झाले आहे.

X