आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैनिकांना ४० हजार स्वदेशी बुलेटप्रूफ जॅकेट पाठवले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काश्मीर खोऱ्यात दहशतवादविरोधी मोहिमेत तैनात सैनिकांसाठी देशात निर्मित ४० हजार बुलेटप्रूफ जॅकेटचा पुरवठा करण्यात आला आहे. हे जॅकेट तयार करणारी कंपनी एसएमपीपी प्रा. लि.च्या वतीने मेजर जनरल अनिल ओबेरॉय यांनी सांगितले की, लष्कराच्या मागणीनुसार नियोजित वेळेपूर्वी सर्व जॅकेटस््चा पुरवठा केला जाईल.

सरकारची जॅकेट पुरवठ्यासाठी २०२१पर्यंतची मुदत आहे. मात्र, २०२०च्या अखेरपर्यंत सर्व जॅकेट तयार होतील, अशी आशा ओबेरॉय यांनी व्यक्त केली. ऑर्डरनुसार पहिल्या वर्षी ३६ हजार जॅकेटस््चा पुरवठा करावयाचा होता. मात्र कंपनीने अधिक जॅकेट पुरवले. 

देशात तयार करण्यात आलेले हे बुलेटप्रुफ जॅकेट अत्यंत कठीण लोखंडापासून तयार केलेल्या गोळ्याही झेलू शकते. म्हणजेच या जॅकेटसमोर एके-४७सारखी शस्त्रे कुचकामी ठरतील. लष्कराला आधुनिक आणि कमी वजनाचे बुलेटप्रुफ जॅकेट उपलब्ध करून देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने गेल्या वर्षी एसएमपीपीसोबत ६३९ काेटी रुपयांचा करार केला होता. या करारानुसार लष्कराला १.८ लाख उच्च दर्जाचे जॅकेट मिळणार आहेत.