आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्कः गेल्या 14 वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर असलेली अभिनेत्री रंभा लवकरच आई होणार आहे. अलीकडेच रंभाचे बेबी शॉवर पार पडले. या कार्यक्रमाचे काही फोटोज रंभाने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. एकाला फोटोला तिने कॅप्शन दिले, 'My love 😍'. आणखी एक फोटो शेअर करुन त्यासोबत तिने लिहिले, 'Dancing 💃🏼 with Kalamaster 😍😘'. रंभाने याचवर्षी मदर्स डे (13 मे) इंस्टाग्रामवर बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो शेअर करुन ती आई होणार असल्याची बातमी आपल्या चाहत्यांना दिली.
'जुडवां'मध्ये सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करणारी रंभा आहे 7 महिन्यांची गर्भवती आहे. रंभाने साऊथसोबतच बॉलिवूड चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ती अखेरची 2004 मध्ये आलेल्या 'दुकान:पिला हाउस'मध्ये झळकली होती.
वयाच्या 16 व्या वर्षी केले होते डेब्यू...
-चित्रपटसृष्टीपासून दूर गेल्यानंतर रंभाने 8 एप्रिल, 2010 रोजी बिजनेसमन इंद्राण पद्मनाथनसोबत तिरुमाला येथे लग्न थाटले. 13 जानेवारी, 2011 रोजी रंभाची थोरली मुलगी लान्या आणि 31 मार्च, 2015 रोजी धाकटी मुलगी साशाचा जन्म झाला. आता वयाच्या 40 व्या वर्षी रंभा तिस-या बाळाची आई होणार आहे.
- रंभाने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी डेब्यू केला होता. 1995 मध्ये ती 'जल्लाद' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये आली. यानंतर ती 'दानवीर', 'जंग', 'कहर', 'जुडवां', 'सजना', 'घरवाली बाहरवाली', 'बंधन', 'मैं तेरे प्यार में पागल', 'बेटी नंबर वन', 'दिल ही दिल में'सह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकली. सलमानशिवाय तिने रजनीकांत, गोविंदा, अक्षय कुमार, अजय देवगन, मिथुन चक्रवर्ती या सुपरस्टार्ससोबत काम केले आहे.
हुंड्यासाठी त्रास दिल्याचा लागला होता आरोप...
हैदराबाद पोलिसांनी जानेवारी, 2017 मध्ये समन पाठवून रंभाला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. रंभाच्या भावाची पत्नी पल्लवीने हुंड्यासाठी त्रास देत असल्याची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी रंभाने तिच्या नव-यासोबतच रंभा आणि इतर कुटुंबीयांच्या नावाचा उल्लेख केला होता. पल्लवीने 1999 मध्ये रंभाच्या भावासोबत लग्न केले होते.
पुढील स्लाईड्सवर बघा, रंभाच्या बेबी शॉवरचे फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.