आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय सलामीवीराचे ४० वर्षांनंतर एकाच मालिकेत ३ शतके, गावसकरांनंतर राेहित पहिला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - फाॅर्मात असलेल्या सलामीवीर राेहित शर्माने (११७) आपल्या घरच्या मैदानावरील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसाेटीत विक्रमी शतकी खेळी केली. यासह त्याने विक्रमाला गवसणी घातली. त्याचे या मालिकेमधील तिसरे शतक ठरले. याच शतकाच्या बळावर भारतीय संघाने पहिल्या डावामध्ये पहिल्या दिवसअखेर शनिवारी ३ बाद २२४ धावा काढल्या. यामध्ये अजिंक्य रहाणेने (८३) नाबाद अर्धशतकाचे माेलाचे याेगदान दिलेे. पहिल्या डावात सलामीवीर युवा फलंदाज मयंक अग्रवाल (१०) आणि तिसऱ्या स्थानावरील पुजारा (०) सपशेल अपयशी ठरले. पहिल्या दिवशी अवघ्या ५८ षटकांचा सामना झाला. 

अंधूक प्रकाशाचा माेठा फटका यादरम्यान बसला. अशातही राेहितचे शतक हेच अधिकच चर्चेत ठरले. ताे आता सुनील गावसकरनंतर एकाच मालिकेत तीन शतके साजरे करणारा पहिला भारतीय सलामीवीर ठरला. गावसकर यांनी १९७९ मध्ये असा पराक्रम गाजवला हाेता. त्यांच्या नावे तीन वेळा एकाच कसाेटीत तीन शतके साजरी करण्याचा पराक्रम नाेंद आहे. 

राेहितचे सत्रात ९ वे शतक, आता विश्वविक्रम आहे एका पावलावर 
सलामीवीराच्या नव्या भूमिकेत सध्या राेहित शर्माची बॅट चागंलीच तळपत आहे. यातूनच त्याने या भूमिकेमध्ये २०१९ च्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवव्या शतकाची नाेंद केली. यात कसाेटीसह टी-२० आणि वनडेच्या फाॅरमॅटचा समावेश आहे. अशी कामगिरी करणारा ताे जगातील चाैथा आणि भारताचा दुसरा फलंदाज ठरला. सचिन (१९९८), स्मिथ, (२००५) आणि डेव्हिड वाॅर्नरने (२०१६) असा पराक्रम गाजवला आहे. आता ताे एकाच वर्षात विक्रमी १० शतकांपासून एका पावलावर आहे.


सुरुवातीची ३ शतके ४७ व  शेवटचे ३ शतक ४ डाव
ांत 
राेहित शर्माचे कसाेटीमधील हे सहावे शतक ठरले. त्याने सुरुवातीची तीन शतके ही ४७ डावांतून पूर्ण केली आहेत. मात्र, त्याने शेवटची तीन शतके ही अवघ्या चार डावांत साजरी करण्याचा पराक्रम गाजवला. त्याने ही सहाही कसाेटी शतके साजरे करण्याचा पराक्रम आपल्या घरच्या मैदानावर गाजवला आहे. यासह त्याच्या कसाेटीमध्ये २ हजार धावा पूर्ण झाल्या. अशी कामगिरी करणारा ताे भारताचा ४० वा फलंदाज ठरला आहे.
 

आफ्रिकेविरुद्ध ४०० धावा पूर्ण करणारा राेहित चाैथा
राेहित शर्माने सलगच्या शतकाच्या बळावर आफ्रिकेविरुद्ध विक्रमी धावांचा पल्ला गाठला. त्याने मालिकेतील चार डावांत १४५ च्या सरासरीने ४३४ धावा काढल्या. आफ्रिकेविरुद्ध मालिकेत पहिल्यांदा भारतीय फलंदाजाने ४०० धावांचा आकडा गाठला. यापूर्वी १९९६ मध्ये अझहरने ३८८ धावांची कमाई केली हाेती. आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदा भारताच्या फलंदाजाने एकाच मालिकेत तीन शतके ठाेकली आहेत.