Home | National | Other State | 400 dinner and 200 breakfast dishesh in Isha Ambanis Prewedding celebration

Pre-Wedding:ईशाच्या लग्नात पाहुण्यांना दिली जाणार 400 डिशची मेजवानी, या सेलिब्रिटी शेफवर जबाबदारी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 07:15 PM IST

लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांची काळजी घेण्यासाठी गेस्ट मॅनेजमेंट अॅप तयार करण्यात आले आहे.

 • 400 dinner and 200 breakfast dishesh in Isha Ambanis Prewedding celebration

  उदयपूर - ईशा अंबानीच्या प्री वेडिंग पार्टीच्या पहिल्या दिवशी पाहुण्यांसाठी लंच आणि डिनर तयार करण्यासाठी सेलिब्रिटी शेफ रितू दालमियावर जबाबदारी सोपवण्यात आली. दालमियाच्या देखरेखितच लंच आणि डिनरच्या 400 डिशेस तयार करण्यात आल्या. तर ब्रेकफास्टसाठी 200 पदार्थांचा समावेश होता.


  सेलिब्रेशनमध्ये हे असेल खास
  - पाहुण्यांसाठी मनीष मल्होत्राचे सेलोन
  - हॉटेलच्या डेकोरेशनमध्ये रंगीत ट्युलिपच्या फुलांचा वापर
  - प्रत्येक हॉटेलच्या मेनगेटवर दिव्यांची सजावट
  - पाहुण्यांसाठी पपेट शोचे आयोजन

  पाहुण्यांसाठी गेस्ट मॅनेजमेंट अॅप
  एअरपोर्टवर गेस्टना अटेंड करण्यासाठी मोठ्या संख्येने हॉस्पिटॅलिटी मेंबर्स लावण्यात आले आहेत. ते गेस्टला अटेंड करत आहेत. तर लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांची काळजी घेण्यासाठी गेस्ट मॅनेजमेंट अॅप तयार करण्यात आले आहे.


  विदेशी मित्रांची रंगत
  फक्त हॉलिवुड आणि बॉलिवुड हस्तीच नव्हे तर ईशाचे भाऊ अनंत आणि आकाश बरोबरच ईशाचा पती आनंदचे विदेशी मित्रही सोहळ्यात रंगत आणणार आहेत. यापैकी काही शुक्रवारी तर काही शनिवारी पोहोचले आहेत. यापैकी बहुतांश चार्टर प्लेनने भारतात आले आहेत.

Trending