आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवार पासून जिल्ह्यातील 4 हजार शाळा, 175 महाविद्यालयांना 31 तारखेपर्यंत सुट्टी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे

औरंगाबाद- कोरोना व्हायरस टाळण्यासाठी गर्दी टाळा असा सल्ला दिला जात आहे. पण सर्वाधिक गर्दी होणारे ठिकाण म्हणजे शाळा आहेत. येथे होणारी गर्दी ही चिमुकल्यांची आहे. विद्यार्थी हा सर्वात जास्त समूहाच्या संपर्कात येतो. समूहामुळे कोरोनाचा संसर्ग जास्त वाढू शकतो अशी भीती असल्याने राज्य सरकारने खबरदारी म्हणून राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण चार हजार शाळा व महाविद्यालये 16 ते 31 मार्चपर्यंत बंद राहाणार आहे. मात्र, दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. करोनाला रोखण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. यासंदर्भात औरंगाबाद जिल्ह्यात महानगरपालिकेच्या 72, नगरपालिका, नगरपरीषदेच्या 19, खासगी अनुदानित प्राथमिक 1723, स्वयंअर्थसाहय्य 793, अनुदानित प्राथमिक व माध्यमिक 156 अशा एकूण 4 हजार 113 शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, दहावी आणि बारावीच्या परीक्षांबरोबरच विद्यापीठांमधील परीक्षा वेळापत्रकानुसारच होतील, असंही पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.

फक्त शहरी शाळा बंद

कोराना पासून बचाव करण्यासाठी शाळा, महाविद्यालयांना 31 मार्च पर्यंत सुटी देण्यात आली आहे. या सुट्या फक्त शहरी भागातील शाळांसाठी असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी दिली. तर शहरी भागात एक आणि ग्रामीण भागासाठी दुसरा असा नियम का? असा सवाल आता शिक्षक संघटनांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...