म्हैसुरू / ४०९ वर्षांचा ऐतिहासिक दसरा मेळावा आज, बघण्यासाठी भारतासह जगातून पाेहोचले १ लाख पर्यटक

येथे ४०९ वर्षांपासून दसऱ्याच्या दिवशी सजवलेल्या हत्तीवरून भव्य मिरवणूक काढण्याची प्रथा आहे

दिव्य मराठी

Oct 08,2019 03:31:00 AM IST

म्हैसुरू - कर्नाटकातील म्हैसुरू शहर देशातल्या सर्वात मोठ्या दसरा मेळाव्यासाठी सजले आहे. येथे ४०९ वर्षांपासून दसऱ्याच्या दिवशी सजवलेल्या हत्तीवरून भव्य मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. मंगळवारी निघणारी ही मिरवणूक पाहण्यासाठी देश-विदेशातून एक लाखापेक्षा जास्त लाेक म्हैसुरूमध्ये आले आहेत. मिरवणूक निघाल्यानंतर म्हैसुरूमधील शाही कुटुंबे आपली अराध्यदेवी चामुंडेश्वरीवर फुलांचा वर्षाव करतील. पर्यटकांच्या मनोरंजनासाठी राज्यातील सर्व ३० जिल्ह्यांच्याही मिरवणुका असतील. सोमवारी म्हैसुरूच्या शाही कुटुंबाने अंबा विलास पॅलेसमध्ये शस्त्रांची पूजा केली. (छाया : बीएसएन रेड्डी)

X
COMMENT