• Home
  • 41 year old women looks like small girl in Bolton

या दोघांना पाहून / या दोघांना पाहून गोंधळतात लोक; बाहेर जातात तेव्हा समजतात गर्लफ्रेंड-ब्वॉयफ्रेंड, पण..

एक असे गुपित जे या महिलने कधीच कोणाला सांगितले नाही.

 

दिव्य मराठी वेब टीम

Dec 07,2018 12:18:00 PM IST

बोल्टन- इंग्लंडमध्ये राहणारी एक महिला सध्या चर्चेचा विषय बनली आहे. शिम्मी मुंशी (वय41) असे या महिलेचे नाव आहे. तिच्याकडे पाहून अनेकांना तिच्या वयाचा अंदाज लावताच नाही. त्यामुळे शिम्मी जेव्हा तिच्या मुलासोबत बाहेर जाते तेव्हा लोक तिला त्याची गर्लफ्रेंड समजतात. तिच्या चेहऱ्यावरील निरागसपणा पाहून तिचे मित्र, नातेवाईक तिचा हेवा करतात.

अनेकांनी तिच्याकडे तरुण दिसण्याचे गुपित असल्याचा असा दावा केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शिम्मी मागील 10 वर्षांपासून एका आजाराने त्रस्त आहे. या आजारामुळे दिवसातून तिला 60 पेक्षा जास्त उलटी होत आहे.

शिम्मीला पाहून गोंधळतात लोक

> शिम्मीने सौंदर्य खुलवण्यासाठी अनेक प्रकारच्या कॉस्मेटिक सर्जरी केल्या असतील किंवा ती चेहऱ्याला वेगवेगळ्या प्रकारचे क्रिम लावत असल्याचा दावा लोकांनी केला आहे.
> शिम्मी सांगते की, 'तिच्या वयात वाढ झाल्यानंतरही चेहऱ्यावर फारसे बदल झाले नव्हते. वयानूसार तिच्या इतर मैत्रिणींमध्ये अनेक बदल होत होते. परंतु शिम्मीच्या चेहऱ्यावर कोणतेच बदल होत नव्हते.
> शिम्मी सांगते की, 'काही वर्षाआधी ती तिच्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी जात होती तेव्हा शाळेत अनेकजण तिला तिच्या सौंदर्याविषयी प्रश्न विचारायचे. परंतु अनेकदा तिच्याकडे लोकांच्या प्रश्नांची उत्तरे नसल्याने ती खूप दु:ख व्हायची.

वापरते ऑफरमधील ब्युटी प्रोडक्ट्स

शिम्मीने सांगितल्यानुसार, तिने एकदाही महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर केला नाही. पण ती चेहऱ्याची खूप काळजी घेते. आपल्या सौंदर्याचे गुपित सांगतांना ती म्हणते की, ग्रीन टी आणि दिवसातून अनेकवेळा पाणी पिते.

दिवसातून करते 50 पेक्षा जास्तवेळा उलट्या

शिम्मीला गॅस्ट्रोपेरिसीर नावाचा आजार असल्याने शिम्मीला दिवसातून जवळपास पन्नासपेक्षा जास्तवेळा उलट्या होतात. अनेक उपचार करुनही या दुर्मिळ आजावर उपाय होत नसल्याने मागील 10 वर्षांपासून शिम्मी या आजाराने त्रस्त आहे.

पुढील स्लाइडवर पाहा Photots...

X
COMMENT