आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

41 वर्षांपूर्वी काँग्रेसची साथ सोडून शरद पवार बनले मुख्यमंत्री, आता पुतणे अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदासाठी सोडली राष्ट्रवादीची साथ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शरद पवारांनी दोन वेळेस काँग्रेसची साथ सोडली, पण नंतर त्यांच्या समर्थनावर परतले
  • पहिल्यांदा 1978 मध्ये जनता पार्टीसोबत मिळून राज्याचे मुख्यमंत्री बनले, 1986 मध्ये परत काँग्रोसची साथ सोडली
  • दुसऱ्यांना 1999 मध्ये सोनिया गांधींचा विरोध करुन काँग्रेसपासून फारकत घेतली, त्यानंतर काँग्रेससोबत राज्य चालवले

नवी दिल्ली- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, पक्षाविरुद्ध गेल्यामुळे अजित पवारांवर अनुशासनात्मक समिती अंतिम निर्णय घेईल. शरद पवार असे नेते आहेत, ज्यांनी आपला राजकीय प्रवास काँग्रेसमधून केला, दोन वेळेस पक्षाविरुद्ध काम केले. पहिल्यांदा 1978 मध्ये तर दुसऱ्यांदा 1999 मध्ये.

मुख्यमंत्री बनण्यासाठी जनता पार्टीशी हातमिळवणी केली
 
1977 च्या निवडणुकीत काँग्रेस पार्टी कांग्रेस(यू) आणि कांग्रेस(आय) मध्ये विभागली गेली. शरद पवार काँग्रेस (यू) मध्या सामील झाले. 1978 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसने वेगवेळी निवडणूक लढवली. पण, राज्यात जनता पार्टीला थांबवण्यासाठी सोबत येऊन सरकार स्थापन केली. पण, काही महिन्यानंतर शरद पवारांनी काँग्रेस (यू) ची साथ सोडून जनता पार्टीच्या समर्थनावर 38 व्या वर्षी मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. ते राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. पण, 1986 मध्ये परत ते काँग्रेसमध्ये सामील जाले आणि 26 जून 1988 पासून 25 जून 1991 दरम्यान दोनवेळा मुख्यमंत्री बनले.

सोनिया गांधीचा विरोध केला, राष्ट्रवादीची स्थापना केली
 
1999 मध्ये सोनिया गांधींऩा काँग्रेस अध्यक्ष बनवण्यात आल्यामुळे शरद पवार, पीए संगमा आणि तारिक अनवर यांनी विरोध केला. त्यामुळे तिघांनाही पक्षातून काढून टाकण्यात आले आणि त्यांनी मिळून 25 मे 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (राकाँपा) सुरू केली. पण, त्यानंतर सगल 15 वर्षे काँग्रेससोबत मिळून राज्यात सरकार स्थापन केले.

2019 मध्ये शरद पवारांविरोधात जाऊन अजित पवार उपमुख्यमंत्री बनले
 
शुक्रवारी संध्याकाळी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बैठकीत एकमताने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी संमती दर्शवण्यात आली. पण, आज सकाळी 5:47 वाजता राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली आणि 7:30 वाजता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 

बातम्या आणखी आहेत...