Home | Khabrein Jara Hat Ke | 42 million year old Tiny monkey discoved in Kenya

1 किलो वजनाच्या माकडांचे 42 लाख वर्षे जुने अवशेष मिळाले, हे जगातील सर्वात लहान माकडं असल्याचा शास्त्रज्ञांना दावा

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 18, 2019, 02:42 PM IST

'नॅनोपीथेकस ब्राउनी' प्रजातीची ही माकडे केन्याच्या शुष्क आणि जंगली भागात राहायचे

 • 42 million year old Tiny monkey discoved in Kenya

  नायरोबी(केन्या)- येथील शोधकर्त्यांनी 42 लाख वर्षे जुने आणि सर्वात लहान माकडांचे अवशेष शोधून काढले आहेत. नॅनोपीथेकस ब्राउनी असे या माकडाच्या प्रजातीचे नाव आहे. असा दावा करण्यात येत आहे की, या माकडांचे वजन फक्त 1 किलोग्राम होते. सापडलेल्या या प्रजातीचा आकार जगातील सर्वात लहान आणि जुन्या 'टॅलापोइन' सारखा आहे. केन्यातील वाळलेल्या गवताळ परिसरात ही माकडे राहत होती.


  बदलत्या पर्यावरणाचा परिणाम पडला
  या अवशेषांचा शोध केन्या नॅशनल म्यूजियम, ड्यूक आणि मिसोरी यूनिव्हर्सिटीने मिळून लावला आहे. केन्या नॅशनल म्यूजियमच्या फेड्रिक कयालोने सांगितल्यानुसार, 42 लाख वर्षे जुन्या माकडांचे अवशेष सांगतात की, पर्यावरणात किती फरक पडला आहे. याचा परिणाम टॅलापोइन आणि नॅनोपीथेकस ब्राउनी या दोघांवर पडला. या अवशेषांना म्यूझिअमध्ये ठेवण्यात आले आहे.


  सध्याचे टॅलापोइन वेळेनुसार आपल्या पूर्वजांपेक्षा खूप लहान होत गेले. याये एक कारण म्हणजे दलदल आणि पाणीदार क्षेत्र त्यांचे राहण्याचे ठिकाण होते, पण आता असे क्षेत्र उरले नाहीत. शोधकर्त्यांनी सांगितले की, 'नॅनोपीथेकस ब्राउनीचा शोध सांगतो की, यांची उत्पत्ती केन्यासाठी मोठे योगदान आहे. ही दुसरी सगळ्यात जुनी माकडांची प्रजाती आहे.

 • 42 million year old Tiny monkey discoved in Kenya

  या ठिकाणी आढळले अवशेष

 • 42 million year old Tiny monkey discoved in Kenya

Trending