आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट फायनलसाठी 42% भारतीय चाहते करू शकतील हनिमून रद्द, जगामध्ये 19 टक्के

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : भारतामध्ये क्रीडा क्षेत्रातील चाहत्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये क्रिकेट हा खेळ आघाडीवर आहे. याचाच प्रत्यय आतापर्यंत झालेल्या विविध स्पर्धेच्या निमित्ताने आला आहे. याच क्रिकेटच्या प्रेमामुळे अल्पावधीमध्ये आयपीएलची स्पर्धा लाेकप्रिय ठरली. याच क्रिकेटच्या वेडापायी आता भारतामधील ४२ टक्के चाहते हे आपला मधुचंद्र (हनिमून) रद्द करू शकतील. तसेच काही चाहते हे नाेकरीवरही पाणी साेडू शकतील, असा अंदाज एका डिजिटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मने केलेल्या सखाेल संशाेधनातून स्पष्ट केले आहे. क्रिकेटच्या फायनलसाठी भारतीय चाहत्यांमधील उत्सुकता प्रचंड शिगेला पाेहोचली आहे, असे ही सर्वेक्षणातून सिद्ध झाले. याचे जगामध्ये प्रमाण १९ टक्के असे नाेंदवले गेले आहे. त्यामुळे या संशोधनातून भारताच्या चाहत्यांमधील क्रिकेटचे प्रेम सर्वाधिक असल्याचे दिसते.

भारतीय चाहते प्रचंड आशावादी


भारताचे क्रिकेट चाहते हे प्रचंड आशावादी असल्याचेही या सर्वेक्षणातून समाेर आले. त्यामुळे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारतीय संघ दाखल हाेईल, अशी आशाही चाहत्यांना वाटत आहे. यामध्ये ४४ टक्के चाहत्यांना भारतीय संघ फायनलमध्ये दाखल हाेईल ही आशा आहे. याच आशावादामुळेच भारतीय चाहते हे नाेकरीसुद्धा धाेक्यात घालू शकतात. याशिवाय ८८ टक्के चाहत्यांना आपल्या संघातील चार खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवतील असे वाटते.

बातम्या आणखी आहेत...