आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 42 year old Mallika Sherawat, Not Ready To Become Mother In Future, Said 'I Am Afraid Of Responsibilities'

भविष्यात आई बनण्यासाठी तयार नाही 42 वर्षांची मल्लिका शेरावत, म्हणाली - 'मला जबाबदाऱ्यांची भीती वाटते' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 42 वर्षांची मल्लिका शेरावत आपला भाऊ विक्रम लाम्बाचा मुलगा रणशेर चे खूप लाड करते. व्यस्त शेड्यूल असूनही ती रणशेरसाठी वेळ काढते. पण ती स्वतः आई होण्यासाठी तयार नाहीये. मल्लिकाने अशातच एका बातचितीदरम्यान सांगितले. झाले असे की, तिला विचारले गेले गेले की, जर तिला लहान मुले एवढी आवडतात तर येणाऱ्या काळात ती कधी स्वतःला पॅरेंटच्या स्वरूपात पाहू इच्छिते का ? उत्तरात मल्लिका म्हणाली की, यासाठी ती तयार नाहीये. 

यामुळे मल्लिकाला आपली मुले नको आहेत... 
आई बनण्यासाठी तयार न होण्यामागचे कारण मल्लिकाने सांगितले, "ही खूप मोठी जबाबदारी असते, जी मला नको आहे. मला लहान मुलाची जबाबदारी घेण्याची भीती वाटते. आता तर जिथे वाटले तिथे कधीही जाऊ शकते. जर माझे बाळ असेल तर मला पूर्णवेळ त्याचा विचार करावा लागेल. त्याची शाळा आणि इतर गोष्टींविषयी विचार करून करून मी पागल होईल. सध्या मी जशी आहे तशीच खुश आहे."

रणशेरसोबतचे विशेष कनेक्शन... 
मल्लिका म्हणते "माझे त्याच्यासोबत (रणशेर) कनेक्शन आहे. माझे बाळ नाहीये. यामुळे रणशेर माझ्यासाठी माझ्या बाळासारखाच आहे. त्याच्यासोबत माझा सर्वात चांगला वेळ जातो. मी त्याच्यासोबत खेळते, त्याला आलिंगन देते, त्याच्यासोबत फिरते आणि सर्वात व्हंग्ला वेळ घालवल्यानंतर त्याला त्याच्या आईवडिलांकडे सोडते." याच्यापुढे हसत हसत ती म्हणाली, "नॅपी बदलणे माझे काम नाही." मल्लिका मागच्यावर्षी रणशेरला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही घेऊन गेली होती.  

पुन्हा प्रेमात पडण्यासाठी तयार आहे मल्लिका... 
मल्लिका काही दिवसांपूर्वीपर्यंत फ्रेंच बिजनेसमन सिरिल ऑक्सेफंसला डेट करत होती. मात्र आता ती सिंगल आहे आणि पुन्हा प्रेमात पडण्यासाठी तयार आहे. ती म्हणते, "साहजिकच मी पुन्हा प्रेमात पडू इच्छिते. रोमान्स खूप चांगला आणि प्रेरणादायक असतो. पण कामातून वेळ मिळेल तेव्हा रोमान्स करेन." शेवटचे वेब सीरीज 'बू सबकी फटेगी' मध्ये दिसलेली मल्लिका चित्रपट 'तुम्हारी प्यारी सुनीता' मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये तिचा सह कलाकार रजत कपूर असणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...