आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएमआयटी'मधून गेले ४३ हजार रुपये चोरीला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर -  बेलाटी येथील बीएमआयटी कॉलेजमधून ४३ हजार ७२८ रुपये चोरीला गेले आहेत. ही घटना तीस नोव्हेंबर रोजी घडली असून आज सलगरवस्ती पोलिसात तक्रार देण्यात आली. आनंद शेवगार (रा. मजरेवाडी) यांनी तक्रार दिली आहे. ते कॉलेजात रोखपाल म्हणून काम करतात. 


२९ नोव्हेंबर रोजी सायंकाळपर्यंत कॉलेजमधील विविध माध्यमातून आलेले ४३ हजार रुपये कपाटात ठेवले होते. काम संपवून जाताना चावी त्यांनी रजिस्ट्रार यांच्याकडे जमा केली होती. ता. ३० रोजी ते सुटीवर होते. त्या दरम्यान त्यांना काॅलेजातून फोन आला की, आपल्या ड्रॉवरमधून चोरी झाली आहे. कपाट उघडे होते. पाहणी केली असता पैसे नव्हते. चोरट्याने पैसे पळविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कार्यालयातील अन्य कपाट, लाॅक तोडले होते. मेन दरवाजा उचकटून चोरटे आत आले. हवालदार शिंदे तपास करीत आहेत. 

 

दहा हजार रुपये चोरीला 
रविवार पेठ, बालाजी विडी येथील कार्यालयातून दहा हजार रुपये चोरीला गेले आहेत. चैतन्य भरतकुमार ब्रम्हभट (रा. दयानंद कॉलेजजवळ) यांनी जेल रोड पोलिसात तक्रार दिली आहे. कारखान्याचा मुख्य दरवाजा कडी कोयंडा उचकटून लॉकरमध्ये ठेवलेले दहा हजार रुपये, बँकेचे पासबुक, पेन ड्राईव्ह, कागदपत्रे असलेली ती पिशवीच चोराने पळवली आहे. फौजदार चानकोटी तपास करीत आहेत. ही घटना २४ नोव्हेंबर रोजी घडली असून आज फिर्याद देण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...