आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 43 year old Bollywood Actress Mahi Gill Lives In Live Inn Relationship, Has A Two and a half Year Daughter

लिव्ह इनमध्ये राहाते 43 वर्षांची बॉलिवूड अभिनेत्री माही गिल, अडीच वर्षांच्या मुलीची आहे आई 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : बॉलिवूड माही गिलने नेहमी आपल्या पर्सनल लाइफला सीक्रेट ठेवणे पसंत केले. पण आता तिने एका इंटरव्यूमध्ये आपल्या पर्सनल लाइफबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. 43 वर्षांच्या माहीने सांगितले की, ती एका मुलीची आई आहे आणि लिव्ह इनमध्ये राहाते.   

 

गोव्याच्या बिजनेसमनला करत आहे डेट... 
आपला आगामी चित्रपट 'फॅमिली ऑफ ठाकुरगंज'च्या प्रमोशनसाठी दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये माहीने सांगितले, माझा एक बॉयफ्रेंड आहे. तो कॅथोलिक नाही. तो गोव्यामध्ये राहातो आणि एक बिजनेसमन आहे. आम्हाला लग्न करायचे आहे पण याने काहीही फरक पडत नाही. आमच्यावर लग्नासाठी कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. मला स्वातंत्र्य आणि आपली स्पेस पाहिजे. आम्हा दोघांसाठी स्वातंत्र्य गरजेचे आहे. आंही एकमेकांचा आदर करतो आणि प्रेमही करतो. प्रत्येक नात्यात सन्मान गरजेचा असतो आणि आम्हाला वाटते नाते पुढे नेण्यासाठी हे गरजेचे आहे. हो, आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहोत. आम्ही लग्न केले नाही पण नक्कीच करू. 

 

अडीच वर्षांच्या मुलीची आई आहे... 
माझी एक मुलगी आहे जि अडीच वर्षांची आहे. तिचे नाव व्हेरोनिका आहे. माझी काकू मुंबईमध्ये तिला सांभाळतात. मी सुद्धा मुंबईमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवते. माहीने 'देव डी', 'गुलाल', 'साहेब बीवी और गँगस्टर', 'साहेब बीवी और गँगस्टर 2', 'दबंग' यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.