आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 महासभांत अनुपस्थित 433; अवघ्या दाेन सभांना 122 नगरसेवकांची उपस्थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महापालिका निवडणुकीच्या काळात विकास कामांचे डाेंगर उभे करण्याचे अाश्वासन देणारे नगरसेवक महापालिकेत नक्की किती काळ उपस्थित असतात याबाबतचा महत्वपूर्ण लेखाजाेखा माहितीच्या अधिकारातून पुढे अाला अाहे. गेल्या दीड वर्षाच्या काळात झालेल्या २५ महासभांपैकी केवळ दाेनच महासभांना सर्व नगरसेवक उपस्थित हाेते. या सभांमध्ये एकूण अनुपस्थितांची संख्या ४३३ इतकी अाहे. विशेष म्हणजे यातील केवळ सहाच नगरसेवकांनी गैरहजर राहण्याचा अर्ज महापालिकेकडे सादर केला हाेता.

 

महापालिकेची फेब्रुवारी २०१७ ला पंचवार्षिक निवडणूक पार पडली आणि मार्च २०१७ रोजी महापौर, उपमहापौर निवडीची महासभा झाली. यानंतर आतापर्यंत एकूण २५ महासभा झाल्या अाहेत. त्यात पाच महासभा विविध कारणांनी तहकूब करण्यात अाल्या अाहेत. ३१ मार्च रोजी झालेल्या महासभेत सर्वाधिक १६११ विषय, प्रस्ताव होते. तर ९ एप्रिल रोजी झालेल्या महासभेत फक्त तीन प्रस्ताव हाेते.

 

२५ महासभांपैकी ८ महासभांना जादा विषय नव्हते. एका महासभेसाठी नगरसेवकांना १०० रुपये भत्ता दिला जातो. जेवढ्या महासभांना नगरसेवक उपस्थित राहतात त्याच महासभेचा भत्ता मिळतो. सलग तीन महासभांना अनुपस्थित राहणारा नगरसेवक महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चा कलम ११ (क) मधील तरतुदीनुसार अपात्र ठरतो.
३० मार्च २०१७ रोजी महापौर, उपमहापौर पदाची निवडणुकीची महासभा झाल्यानंतर १२ महासभेनंतर म्हणजे २० डिसेंबर २०१७ रोजीच्या महासभेत ५ स्वीकृत नगरसेवकांची निवड झाली. असे एकूण १२७ नगरसेवक विद्यमान स्थितीत आहेत. सभागृहात आजपर्यंत झालेल्या महासभेत कधीही १२७ नगरसेवक उपस्थित राहिलेले नाहीत. ही सर्व माहिती नगरसचिव विभागाकडून माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील अाेसवाल यांना माहिती अधिकारात देण्यात अाली अाहे.

 

करवाढीची महासभा चालली बारा तास
फेब्रुवारी २०१७ ते जुलै २०१८ या काळात झालेल्या महासभांमध्ये १९ जुलै रोजी झालेली सभा तब्बल १२ तास अर्थातच सकाळी ११.३० ते रात्री ११.३० वाजेपर्यंत सुरू हाेती. १२ तास सर्वाधिक वेळ चाललेली ही महासभा असल्याची नोंद करण्यात आली आहे. या महासभेला १२२ नगरसेवक उपस्थित होते. याच महासभेत करवाढीच्या प्रश्नावर चर्चा झाली होती. सर्वात कमी उपस्थिती असलेली महासभा १९ मे २०१८ रोजी झाली. या महासभेत १२७ पैकी ४२ नगरसेवक उपस्थित असल्याने गणपूर्तीअभावी तहकूब करण्यात आली हाेती.

 

दाेन महासभांना सर्वाधिक उपस्थिती
२३ एप्रिल व १९ जुलै २०१८ या दोन महासभांना सर्वाधिक १२२ नगरसेवक उपस्थित होते. गैरहजर असलेल्या ४३३ नगरसेवकांपैकी ६ नगरसेवकांचे महासभेत अनुपस्थित राहण्याबाबत रजेचे अर्ज नगरसचिव विभागाला प्राप्त झाले आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...