आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनीषा भल्ला
मुंबई- शुक्रवारी देशात एका मोठ्या आॅनलाइन कंपनीचा सेल संपला. यादरम्यान आम्ही प्रतिसेकंद एक टीव्ही विकला आहे, असा दावा या कंपनीने केला. त्या पार्श्वभूमीवर देशात टीव्ही कोण पाहत आहे आणि त्यावर सर्वाधिक काय पाहिले जात आहे, हे ‘दिव्य मराठी’ने जाणून घेतले. त्यात अनेक आश्चर्यजनक गोष्टी समोर आल्या. उदा. ७९ टक्के स्मार्टफोन युजर (टेकआरसीचा अहवाल) मोबाइलवर नेटफ्लिक्स आणि अॅमेझाॅन प्राइम यांसारखे ओटीटी (ओव्हद द टाॅप) प्लॅटफाॅर्म पाहतात. तरीही गेल्या चार वर्षांत टीव्ही पाहण्याच्या वेळेत दररोज सुमारे १६ मिनिटांची वाढ झाली आहे. देशात ६१ कोटींपेक्षा जास्त लोक रोज टीव्ही पाहत आहेत. सर्वात विशेष बाब म्हणजे टीव्हीच्या प्रेक्षकांत महिलांची संख्या सतत वाढत आहे. सध्या टीव्हीच्या प्रेक्षकांत महिला आणि पुरुषांचे प्रमाण समान झाले आहे.
ब्राॅडकास्ट आॅडियन्स रिसर्च कौन्सिल इंडियाचे सीओओ रोमिल यांनी सांगितले की, नोटबंदीनंतर म्हणजे नोव्हेंबर २०१६ नंतर महिलांनी टीव्ही जास्त पाहणे सुरू केले. त्यांची टीव्ही पाहण्याची संख्या ४४ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. त्याचे एक मोठे कारण म्हणजे महिलांनी हिंदी न्यूज बुलेटिन पाहणे सुरू केले आहे. बातम्या पाहणाऱ्या महिलांची संख्या ३३ टक्के वाढली आहे. बातम्यांव्यतिरिक्त टीव्हीवरील धार्मिक आणि क्राइम शोने महिलांची टक्केवारी वाढवली आहे. ते म्हणाले की, सावधान इंडिया आणि क्राइम पेट्रोलसारख्या कार्यक्रमांची व्ह्यूअरशिप फक्त महिलांवर सुरू आहे. ओटीटी तर वाढणारच, पण त्याचा टीव्हीशी काही संबंध नाही. परवरिश, जस्सी जैसी कोई नहीं यांसारख्या मालिकांचे लेखक सत्यम त्रिपाठींच्या मते, टीव्ही आता फक्त शहरांपुरताच मर्यादित नाही. राधाकृष्ण, साईंबाबा आणि शनी यांसारख्या धार्मिक मालिका महिला श्रद्धेने पाहतात. विशेष म्हणजे भारतात टीव्ही पाहण्याचा प्रतिव्यक्ती सरासरी वेळ ३ तास ४० मिनिटे आहे, तर अमेरिकेत तो ४ तास ३० मिनिटे आहे. भारतात सध्या १० कोटी घरांत टीव्ही नाही. अमेरिकेत ओटीटी प्लॅटफाॅर्म असूनही टीव्ही संपला नाही तर भारतातही होणार नाही. डिजिटलायझेशननंतर टीव्हीही प्रगतीचे नवे शिखर गाठेल.
घरांत टीव्ही आहे देशात. एकूण २९.७ कोटी घरे आहेत. ९७% घरांत आजही एकच टीव्ही.
90%
घरांत टीव्ही आहे दक्षिणेकडील ५ राज्यांत. तेथे दररोज सरासरी ४ तास टीव्ही पाहिला जातो.
२००५ मध्ये होते १३० चॅनल, आता ८००+
देशात २००५ मध्ये सुमारे १३० चॅनल टीव्हीवर पाहता येत होते. हा आकडा वेगाने वाढत आहे. २०१० मध्ये चॅनलची संख्या २६५ पेक्षा जास्त झाली आणि २०१३ पर्यंत ही संख्या ५५० वर गेली. २०१८ मध्ये देशात ८०० पेक्षा जास्त चॅनल सुरू होते. टीव्ही पाहण्यात संपूर्ण देशात सर्वात पुढे आंध्र प्रदेश आणि तेलंगणचे लोक आहेत. तेथे दररोज सरासरी ४ तास १२ मिनिटे ५६ सेकंद टीव्ही पाहिला जातो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.