आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

45 देशांच्या बाॅडी बिल्डरचा सहभाग; विजेते ठरणार 25 लाखांचे मानकरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डायमंड कप इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धा आजपासून रंगणार
  • संधी आजपासून विभागीय क्रीडा संकुल येथे अायाेजन

औरंगाबाद : इंटरनॅशनल फेडरेशन आॅफ बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस संघटनेच्या (आयएफबीबी) मान्यतेने 'डायमंड कप इंडिया २०१९' आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा आजपासून विभागीय क्रीडा संकुल येथे रंगणार आहे. दोन दिवस चालणा-या स्पर्धेसाठी शेकडो बलदंड शरीर असलेले खेळाडू शहरात डेरेदाखल झाले आहेत. आज १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता स्पर्धेला सुरुवात होईल.


शुक्रवारी खेळाडूंचे वजने घेण्यात आली. शनिवार व रविवारी होणा-या स्पर्धेत ४५ देशातील ४५० पेक्षा अधिक खेळाडूंनी प्रवेश निश्चित केला. विजेत्या खेळाडूंना एकूण २५ लाखांची बक्षिसे देण्यात येतील. खेळाडूंची निवास, भोजनाची व्यवस्था शहरातील हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. या स्पर्धेत पुरुष क्लासिक, पुरुष फिजिक, महिला बिकिनी, महिला फिटनेस आदी स्पर्धेचा थरार पाहायला मिळेल.


मोफत प्रवेश : संकुलात १०० बाय ४० फुटांचे भव्य व्यासपीठ, एलईडी लाइट, एलईडी स्क्रीन स्पर्धेदरम्यान लावण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी ३० हजार चाहत्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

स्नेहा, किशोर, सिद्धांतचे खास आकर्षण
स्पर्धेत आशियाची पदक विजेता स्नेहा कोकणे-पाटील, महिला फिजिक्सची पल्लवी डोशी, सोना आनंद, पायल सक्सेना यांच्यासह मराठवाड्याचा पहिला जागतिक पोलिस स्पर्धेचा पदक विजेता किशोर डांगे, आंतरराष्ट्रीय खेळाडू सिध्दांत मोरे, आमिर खान, संकेत बलराम, संजय लांडे हे दिग्गज शरीरसौष्ठवपटू मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल.

 

बातम्या आणखी आहेत...