Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | 45-year-old man's murder by weapons in vardha

वर्ध्यात ४५ वर्षीय व्यक्तीची धारधार शस्त्राने हत्या

प्रतिनिधी | Update - Aug 25, 2018, 11:38 AM IST

स्थानिक आनंद नगर येथील ४५ वर्षीय गांजा विक्रेता असलेल्या इसामाची धारधार शस्त्राने वार करीत हत्या केल्याची घटना २४ अाॅग

  • 45-year-old man's murder by weapons in vardha

    वर्धा- स्थानिक आनंद नगर येथील ४५ वर्षीय गांजा विक्रेता असलेल्या इसामाची धारधार शस्त्राने वार करीत हत्या केल्याची घटना २४ अाॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे.


    प्राप्त माहिती नुसार मिलिंद सुभाष मेश्राम वय ४५ वर्ष रा आनंद नगर हा गांजाची विक्री करीत होता. मुलगी झोपेमधून पहाटेच्या सुमारास उठली असता, तिला तिचे वडील दिसेनासे झाल्यामुळे तिने घराच्या बाहेर पाहणी केली असता,तिला रक्ताचे डाग दिसून आले. मृतक मिलिंद मेश्राम यांचा मृतदेह घराजवळ असलेल्या शौचालय करिता बांधण्यात आलेल्या खड्यांमध्ये आढळून आला. आरोपीने मिलिंदची हत्या करुन धारदार शस्त्राने शरीरावर ३१ घाव घातले असून, पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने रक्ताचे डाग पाण्याने धुऊन टाकण्याचा प्रयत्न करीत मृतदेह बाहेर असलेल्या खड्यांमध्ये फेकून पसार झाला. या प्रकरणी मृतकाच्या मुलीने वर्धा शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्याकरिता पाठविला असून,अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येचे गूढ अद्यापही गुलदस्त्यात असल्याचे पोलिसांकडून बोलले जात आहे. मिलींद मेश्राम यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितास ताब्यात घेतले असून,त्यांची सखोल चौकशी करण्यात येत आहे.पुढील तपास पोलीस करीत आहे.

Trending