आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४५० कोटींचा जीएसटी घोटाळा : एमडी अटकेत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विशाखापट्टणम - जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) अधिकाऱ्यांनी ४५० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात एका कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाला (एमडी) अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.

डीजीजीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पायाभूत क्षेत्रातील प्रकल्प आणि सरकारी कंत्राटदारांशी संबंधित या कंपनीने सेवा न देताच खोटी देयके जारी केली. विशाखापट्टणम भागात अलीकडच्या काळात समोर आलेल्या जीएसटी घोटाळ्याच्या प्रकरणांत हा घोटाळा सर्वात मोठा असल्याचे म्हटले जात आहे. 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, डीजीजीआयने आंध्र प्रदेश, तेलंगण आणि तामिळनाडू या तीन राज्यांत विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांदरम्यान अनेक कागदपत्रे जप्त केली होती. सुरुवातीच्या चौकशीत समजले की, कंपनीने सप्टेंबर २०१८ ते ऑगस्ट २०१९ च्या दरम्यान ४५० कोटी रुपयांची बनावट देयके जारी केली होती. त्याबदल्यात ६७ कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करण्यात आला. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाला न्यायालयाने ३० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.

बातम्या आणखी आहेत...