आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदर स्वच्छतेदरम्यान सापडला 450 किलोचा बाॅम्ब; बाॅम्ब निष्क्रिय करण्यासाठी सशस्त्र कारखान्याशी संपर्क

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- कोलकात्याच्या नेताजी सुभाष बंदराच्या स्वच्छता अभियानादरम्यान शुक्रवारी दुसऱ्या महायुद्धातील बाॅम्ब सापडला. हा अमेरिकेने तयार केलेला हा बाॅम्ब असून त्याची लांबी ४.५ मीटर आहे. त्याचे वजन ४५० किलोग्रॅम आहे. हा बाॅम्ब फुटला असता तर किमान अर्धा किलोमीटर परिसरातील रहिवासी भागातील लोकांच्या प्राणास धोका होता, असे तज्ज्ञांनी सांगितले.

 

कोलकाता पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष विनीत कुमार म्हणाले, सुरक्षेच्या दृष्टीने हा बाॅम्ब निष्क्रिय करण्यासाठी संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आहे. पोलिस, नौदल तसेच लष्कराला याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. सुरुवातीला तारपिडो असल्याचे आम्हाला वाटले. परंतु नौदलाच्या तज्ज्ञांनी हा बाॅम्ब असल्याची माहिती दिली. बाॅम्बला निष्क्रिय करण्यासाठी लष्कराचीदेखील मदत मागवण्यात आली आहे. शस्त्रनिर्मिती करणाऱ्या कारखान्यातील तज्ज्ञांच्या मदतीने हा बाॅम्ब निष्क्रिय केला जाऊ शकतो.

 

पश्चिम बंगालचे नौदल अधिकारी सुप्रभो डे यांच्या मते, बाॅम्बचा काहीही धोका नाही. कारण या बाॅम्बमध्ये अनेक प्रकारचे सेक्युरिटी लॉक आहेत. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर हा बाँब येथेच राहिला होता. हा बाॅम्ब पुढे काही कारणामुळे पाण्यात पडला. त्यानंतर आता हा बाँब सापडला. आम्ही या बाॅम्बला निष्क्रिय करण्यासाठी तज्ज्ञांच्या संपर्कात आहोत. हा बाॅम्ब निष्क्रिय करण्यात आल्यानंतर त्याला आम्ही बंदरावरच सुरक्षित ठेवणार आहोत, असे पोर्ट ट्रस्टचे सल्लागार गौतम चक्रवर्ती यांनी सांगितले.

 

अमेरिकी सैन्याकडून वापर :
दुसऱ्या महायुद्धादरम्यान १९४२ ते ४५ दरम्यान चीन-म्यानमार-भारत युद्धक्षेत्रात अमेरिकेच्या सैन्याने अशाच प्रकारच्या बाॅम्बचा वापर केला होता. अमेरिकेच्या सैन्याने नेताजी सुभाष बंदराचाही युद्धासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला होता. पहिल्यांदा हे बंदर किंग जॉर्ज बंदर या नावाने आेळखले जात. २९ डिसेंबर १९१८ रोजी लॉर्ड इर्विन यांनी बंदराचे उद्घाटन केले होते. तेव्हा जपानी सैन्याच्या रडारवर हे बंदर होते.

 

बातम्या आणखी आहेत...