आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई: कोरिओग्राफर शामक दावर हे नाव सर्वांनाच परिचयाचं आहे. शामक यांचं नवीन प्रतिभेवर नेहमीच लक्ष असतं. 2004 मध्ये सामाजिक समस्या आणि प्रश्नांचे निवारण करण्यासाठी शामक दावर यांनी व्हिक्टरी आर्ट फाउंडेशनची स्थापना केली. व्हिक्टरी आर्ट वय, लिंग आणि जात-पात या सर्वांसाठी कोणताही पूर्वग्रह न ठेवता नृत्य करण्यास संधी देते. व्हिक्टरी आर्ट नृत्य शक्तीचा उपयोग करून वंचित, शारीरिकरित्या, मानसिकरित्या आव्हानात्मक, दृष्टिहीन आणि मूक-बधिर मुलांच्या जीवनात आनंद आणण्याचा तसेच नाचण्यायोग्य बनवून करियर पर्याय ही तयार करते. नुकताच शामक दावर व्हिक्टरी आर्ट फाउंडेशनने जागतिक अपंगत्व दिन साजरा केला. याचे आयोजन सेंट अॅन्ड्र्यूज सभागृहात करण्यात आले होते. जागतिक अपंगत्व दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात 14 स्वयंसेवी संस्थांच्या 450 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत नेत्रदीपक कामगिरी केली. वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांमधील सर्व मुलांना शामकच्या उत्कृष्ट नृत्य विद्याशाखेतर्फे प्रशिक्षण देण्यात आले होते. प्रेक्षकांनी विशेष मुलांना प्रोत्साहित केले. या अनुभवाविषयी शामक दावर म्हणतात, नृत्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही आणि लोकांना हे ही माहित नाही की नृत्यात बरे करण्याची क्षमता असते. सुमारे ३० वर्षांपूर्वी जेव्हा मी नुकताच माझा वर्ग सुरू केला तेव्हा पोलिओ ग्रस्त मुलगी माझ्याकडे आली आणि मला सांगितले की तिला माझ्या वर्गात यायचे आहे. ती पायही हलवू शकत नाही हे जाणून घेतल्यानंतर मी तिला ताबडतोब माझ्या वर्गात दाखल करण्यास सांगितले. एक वर्ष पूर्ण केल्यावर ती मला म्हणाली, तुम्हाला माहिती आहे का माझे डॉक्टर मला म्हणाले की तुझे हात हलणार नाहीत त्यापेक्षा जास्त हलत आहेत. हा चमत्कार आहे, ज्यामुळे मला असे वाटते की नृत्य खरंच एखाद्या व्यक्तीबरोबर असे करू शकते. व्हिक्टरी आर्ट्स फाउंडेशन ही एक एनजीओ आहे, जी बौद्धिक अपंगत्व असलेल्या मुलांसह डाउन सिंड्रोम, सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम, व्हीलचेयर वापरणार्या व्यक्ती, क्रॉच आणि कॅलिपर, व्हिचुअल कमजोरी असलेल्या व्यक्ती, श्रवण क्षमता कमी असलेल्या व्यक्ती, भावनिक आघात झालेल्या मुलांसाठी कार्य करते. अनाथ, बांधकाम कामगारांची मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला/ मुले जे मानवी तस्करीला बळी पडतात आणि घरगुती हिंसाचाराचा बळी पडतात किंवा आजाराने ग्रस्त मुले आणि प्रौढ (कर्करोग, स्किझोफ्रेनिया आणि एचआयव्ही संक्रमित), कायद्याशी संघर्ष करणारे मुले आणि प्रौढ यांच्यासाठी काम करते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.