आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील सिंचनासाठी लवकरच मिळणार 4500 काेटी; राज्य शासनाने दिली तत्त्वतः मान्यता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी लवकरच मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाला ४५०० काेटींचा निधी उपलब्ध हाेणार आहे. राज्य शासनाने याला तत्त्वतः मान्यता दिली आहे. यामुळे महामंडळाला २००९ नंतर प्रथमच मराठवाड्यातील कामांसाठी निधी उपलब्ध हाेणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष डाॅ. भागवत कराड यांनी दिली. 

 

बुधवारी 'दिव्य मराठी' कार्यालयाला डाॅ. कराड यांनी भेट दिली. या प्रसंगी त्यांनी मराठवाड्यातील सिंचन व रस्ते अनुदानासंदर्भात चर्चा केली. मराठवाड्यातील ९ पैकी ७ उपखाेरे अति तुटीचे व २ उपखाेरे तुटीच्या क्षेत्रात येतात. त्यामुळे मराठवाड्यात कायम दुष्काळ असताे. सध्या मराठवाड्यात सिंचनाचे प्रमाण २०% आहे. विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात याचे प्रमाण अधिक असल्याचे डाॅ. कराड म्हणाले. 

 

केंद्राकडे मागितले ७१६० काेटी 
राज्यात समप्रमाणात पाणी उपलब्ध नाही. महाराष्ट्रात ४६% वहिती क्षेत्रात ७६, विदर्भात २८ क्षेत्रात १८% परंतु, मराठवाड्यात २६ % वहिती क्षेत्रात केवळ ६% पाणी उपलब्ध आहे. अागामी काळात निर्माण हाेणारी भीषण पाणी टंचाई पाहता पंतप्रधान कृषी सिंचन याेजना व बळीराजा जलसंजीवनी याेजनेअंतर्गत मराठवाडा विभागास ७१६० काेटींचे अर्थसाहाय्य मिळावे अशी मागणी परिवहन व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आल्याचे डाॅ. कराड म्हणाले. मराठवाड्यात कृष्णा मराठवाडा व नांदेडच्या लेंडी प्रकल्पासह ८ इतर प्रकल्प रखडले आहेत. त्यांच्यासाठी निधी मिळाल्यास मराठवाड्याचा अनुशेष दूर हाेईल असा विश्वासही या प्रसंगी बाेलताना डाॅ. कराड यांनी व्यक्त केला. 

 

औरंगाबादेत सुरू हाेणार साउंड अँड लाइट शाे 
औरंगाबादमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी लवकरच साउंड अँड लाइट शाे सुरू करण्याचे महामंडळाचे प्रयत्न असून, यासाठी दाैलताबादचा किल्ला, बीबी का मकबरा, साेनेरी महल यांचा विचार केला जात आहे. महामंडळाच्या या मागणीलाही राज्य शासनाने तत्त्वतः मंजुरी दिली असल्याचे डाॅ. कराड म्हणाले. लवकरच याबाबतची घोषणा राज्य शासन करणार असल्याची माहितीही डाॅ. कराड यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...