Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | 459 extra votes counted in hatkangale said by raju shetti

राजू शेट्टींचा खळबळजनक आरोप, हातकणंगलेमध्ये 459 जास्त मते निघाली, शेट्टींची निवडणूक आयोगाकडे तक्रार

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 31, 2019, 12:52 PM IST

राजू शेट्टींना या लोकसभा निवडणुकीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले

  • 459 extra votes counted in hatkangale said by raju shetti

    कोल्हापूर- हातकणंगले मतदारसंघात मतमोजणीच्यावेळी 459 मते जास्त निघाल्याचा आरोप माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर एकच खळबळ माजली असून पुन्हा एकदा ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे. राजू शेट्टींनी याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सांगितले, "हातकणंगले मतदारसंघात ईव्हीएमद्वारे एकूण 12 लाख 45 हजार 797 मतदान झाले होते. मात्र, मतमोजणीदरम्यान ईव्हीएममध्ये 12 लाख 46 हजार 256 मते मोजली गेली. याप्रमाणे झालेल्या मतदानापेक्षा एकूण 459 मते जादा झाली आहेत." यामध्ये पोस्टलची मते धरलेली नसल्याचेही राजू शेट्टी यांनी नमूद केले.


    दोनवेळचे खासदार राहिलेले राजू शेट्टींना या लोकसभा निवडणुकीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी शेट्टींचा पराभव केला. कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेचे 2 मतदारसंघ आहेत. एक कोल्हापूर आणि दुसरा हातकणंगले. हातकणंगले मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतदान झाले होते. हातकणंगलेमध्ये 70.28 टक्के मतदान झाले. पण 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2 टक्के मतदान कमी झाले होते. 2014 मध्ये याठिकाणी 72.09 टक्के इतकं मतदान झालं होतं.

Trending