आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 46 year old Leander Pes Will Retire After Next Season; He Is The Only Indian To Win An Olympic Medal In Tennis

46 वर्षीय लिएंडर पेस पुढील सत्रानंतर घेणार निवृत्ती; तो टेनिसमध्येे ऑलिम्पिक पदक जिंकणारा एकमेव भारतीय

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • 28 वर्षे खेळलेला पेस 2020 मध्ये निवडक स्पर्धा खेळणार
  • सात ऑलिम्पिक खेळणारा जगातील एकमेव टेनिसपटू

​​​​​​​नवी दिल्ली : भारतीय टेनिस आयकॉन लिएंडर पेस पुढील सत्रानंतर अापल्या २९ वर्षाच्या करिअरला पूर्ण विराम लावेल. ४६ वर्षीय पेसने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत टेनिसमधील निवृत्तीची गोष्ट चाहत्यांना सांगितली. पेसने म्हटले की, २०२० त्याचे व्यावसायिक स्पर्धेचे अखेरचे सत्र असेल. तो पुढील वर्षी निवडक स्पर्धा खेळेल. भारताच्या सर्वात यशस्वी टेनिसपटू पेसने करिअरमध्ये मोठे यश मिळवले आहे. १९९१ मध्ये करिअरला सुरुवात करणारा पेस ऑलिम्पिकमध्ये टेनिसचे पदक जिंकून देणारा एकमेव भारतीय आहे. त्याने १९९६ मध्ये अटलांटा ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकले. तो ७ ऑलिम्पिक खेळणारा जगातील एकमेव टेनिसपटू आहे. त्याने १९९२ ते २०१६ दरम्यान ऑलिम्पिक खेळला.

डेव्हिस कपचे ४४ सामने जिंकले

पेस डेव्हिस कपमधील सर्वात यशस्वी खेळाडू आहे. त्याने ४४ सामने जिंकले. त्याची दुहेरी क्रमवारी १०५ आहे. तो १९ वर्षांत पहिल्यांदा अव्वल १०० मधून बाहेर झाला. त्याने आतापर्यंत १ एकेरी व ५४ दुहेरी व १० मिश्र दुहेरीचे किताब जिंकले. पेस ९० च्या दशकात महेश भूपती सोबत यशस्वी ठरला. तेव्हा पेस-भूपतीने ३ ग्रँड स्लॅम जिंकले व क्रमवारीत नंबर १ पर्यंत पोहोचले होते.

पेसने #OneLastRoar ट्विट करत चाहत्यांना त्यांच्या आठवणी शेअर करण्यास सांगितले

पेसने ट्विट केले - २०२० माझे प्राे टेनिसचे अखेरचे वर्ष असेल. मी पुढील वर्षाचे टेनिस कॅलेंडर पाहतोय. मी खूप कमी स्पर्धा खेळणार आहे. आपल्या टीमसोबत संपूर्ण जगात फिरून मित्र व चाहत्यांसोबत आनंद साजरा करेल. तुम्ही सर्व चाहत्यांनी मला नेहमी खेळवण्यासाठी प्रेरित केले आहे. सध्या मी जो आहे, तो तुमच्यामुळे. तुमच्या सर्वांचे आभार. मी आपल्या कुटुंबाचे आभार मानतो, ज्याच्या जेनेटिक्स, मार्गदर्शन, शिस्तीमुळे येथपर्यंत पोहोचलो. मी दोन्ही मोठ्या बहिणींचे देखील आभार मानतो. पेसने #OneLastRoar ट्विट करत चाहत्यांना त्याच्या संबंधित आठवणी शेअर करा.