Home | International | Other Country | 47 killed in horror crash after busses collided in zimbabwe

Accident: समोरा-समोर धडकल्या 2 प्रवाशी बस; भीषण अपघातात 47 जणांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 08, 2018, 04:59 PM IST

झिम्बाब्वेची वृत्तसंस्था हेराल्डने घटनास्थळाचे काही फोटो जारी केले.

  • 47 killed in horror crash after busses collided in zimbabwe

    हरारे - झिम्बाब्वेत राजधानीवरून आणि उलट्या दिशेने येणाऱ्या दोन भरधाव प्रवासी बस एकमेकांना समोरासमोर धडकल्या. या भीषण अपघातात 47 जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. पोलिस प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 47 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. सोबतच रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. झिम्बाब्वेची वृत्तसंस्था हेराल्डने घटनास्थळाचे काही फोटो जारी केले. त्यामध्ये सर्वत्र मृतदेहांचा खच दिसून येत आहे.

    खड्ड्यांमुळे घडला अपघात
    दोन्ही बसमध्ये प्रवाशी पूर्णपणे भरले होते. त्यामुळे, जखमींची संख्या एवढी आहे की रुग्णालयात बेड कमी पडत आहेत. त्या सर्वांवर रुसापे शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतदेह ठेवण्यासाठीही जागा नसल्याने जवळच्याच एका खासगी दफनभूमीची मदत घेण्यात आली आहे. गरीब आफ्रिकी राष्ट्रांपैकी एक झिम्बाब्वेत रस्त्यांची समस्या गंभीर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हायवेवर मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे अपघात घडतात. हा अपघात देखील खड्ड्यांमुळे घडला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी जून महिन्यात उत्तर झिम्बाब्वेत असाच भीषण अपघात खड्ड्यांमुळे झाला होता. त्या अपघातात 43 जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. झिम्बाब्वेचे वाहतूक मंत्री फॉर्च्युन चासी यांनीही हा अपघात खड्ड्यांमुळेच घडल्याची कबुली दिली. सोबतच सरकार रस्ते दुरुस्ती करण्याचे काम प्रथम प्राधान्य देऊन करणार असे आश्वस्त केले.

  • 47 killed in horror crash after busses collided in zimbabwe
  • 47 killed in horror crash after busses collided in zimbabwe

Trending