आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 48 Development Work Worth Twelve Hundred Crores Done In Varanasi : Yogi, 1 Lac 89 Thousand Farmers Benefit From Schemes

वाराणसीत बाराशे कोटींची 48 विकासकामे : योगी, 1 लाख 89 हजार शेतकऱ्यांना योजनांचा लाभ

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

वाराणसी : वाराणसीत विकासकामांचा विक्रम झाल्याचा दावा करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १२२२ कोटी रुपयांची ४८ प्रमुख विकासकामे पूर्ण झाल्याची माहिती दिली. हजारो कोटी रुपयांची कामे सुरू असून काही कामे सुरू करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

वाराणसीत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर अाले आहेत. आढावा बैठकीत बोलताना आदित्यनाथ यांनी सांगितले की, वाराणसीत पूर्ण झालेल्या कामांमध्ये काशी हिंदू विद्यापीठात सुपरस्पेशालिटी वैदिक विज्ञान केंद्र, राजातालाब वीज उपकेंद्र, २० मुख्य मार्गांचे काम, रुग्णालयांच्या आधुनिकीकरणाच्या कामांचा समावेश आहे. आदित्यनाथ यांनी सांगितले की, येत्या वर्षात हजारो कोटी रुपयांची विकासकामे वाराणसीत पूर्ण केली जातील, तर शेकडो कोटींची कामे सुरू करण्यात येणार आहेत. वाराणसीच्या विकासासाठी निधीची कमतरता नसल्याचे सांगत आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, जगासमोर एक आदर्श म्हणून काशीची ओळख निर्माण करा. यामुळे स्मार्ट सिटीसह अशा मूलभूत सुविधा द्या, ज्यात पुढील दहा वर्षांपर्यंत रस्ते, पाणी, वीजसारख्या मूलभूत गोष्टींपासून लोकांना वंचित राहावे लागणार नाही. काशीतील बाबा कालभैरव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. १५ दिवसांत रस्ते दुरुस्त करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. आरोग्यसेवेवर लक्ष केंद्रित करत २ फेब्रुवारी २०२० पासून राज्यातील प्रत्येक प्राथमिक आराेग्य केंद्रात पुढील दोन वर्षे आरोग्य मेळावे आयाेजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या मेळाव्यात शासकीय आणि खासगी डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. पशू आरोग्य मेळाव्यात जनावरांवर मोफत उपचार केले जाणार अाहेत. प्राथमिक शाळांच्या इमारती उभारण्याबरोबरच भूजल संरक्षणाच्या कामात गती आणण्याचेही निर्देश दिले. वाराणसीला स्वच्छ शहर करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

वाराणसी, रामनगर आणि गंगापूर भागातील २४ हजार ४१७ कुटुंबांसाठी पंतप्रधान आवास योजनेचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. एखाद्या कामात कंत्राटदाराने हलगर्जीपणा केला तर त्याच्याविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

१ लाख ८९ हजार शेतकऱ्यांना लाभ

आयुष्मान भारत योजनेत वाराणसीत २४ हजारांपेक्षा जास्त लोकांवर मोफत उपचार करण्यात आल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, यासाठी २८ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत १ लाख ८९ हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे, तर १७८० कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देण्यात आला आहे.