आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचारासाठी उरले शेवटचे ४८ तास; भेटीगाठी वेगात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - महापालिकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान हाेणार अाहे. निवडणुकीपूर्वी ४८ तास अगाेदर प्रचार थांबणार अाहे. शुक्रवारी (दि.७) सायंकाळी ७ वाजता प्रचाराच्या ताेफा थंडावणार अाहेत. त्यामुळे उमेदवारांकडे अाता प्रचारासाठी केवळ ४८ तास शिल्लक अाहेत. या ४८ तासांत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पाेहाेचण्याचे नियाेजन सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून करण्यात अाले अाहे. त्यासाठी या दाेन दिवसात प्रचारफेरी, काेपरा सभांसह माेठ्या नेत्यांच्या सभा हाेणार अाहेत. 

 

महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्ष व उमेदवारांनी शहरातील व प्रभागातील प्रमुख चाैकात काॅर्नर सभा, काेपरा सभाही घेतल्या. याशिवाय जास्तीत जास्त मतदारांपर्यंत अापले नाव, पक्ष, चिन्ह पाेहाेचावे यासाठी प्रभागातून हातगाडी, रिक्षा फिरवणे अादींसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत एलईडी स्क्रीनवर व्हिडिअाे चित्रफीत दाखवून त्यातून मतदारांना अाकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात अाला. यंदा नव्याने प्रभागरचना झाल्याने प्रभागाचा विस्तारही माेठा झाला. त्यात अनेक नवीन भागांचा समावेश झाल्याने तेथील मतदारांपर्यंत पाेहाेचण्यासाठी उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागली. अनेक उमेदवारांची प्रभागात पहिली प्रचार फेरीही पूर्ण हाेऊ शकलेली नाही.

 

काही उमेदवारांनी अापल्याला कुठून प्रतिसाद मिळू शकताे याचा अंदाज घेऊन त्याच प्रभागात प्रचारावर अधिक भर दिल्याचे दिसून अाले. तर काही प्रमुख उमेदवारांनी अापल्याला सर्व प्रभागात फिरणे शक्य नसल्याने कुटुंबातील पत्नी, अाई व भाऊ, वहिनी अादींनाही प्रचारात उतरवून त्यांना त्यांच्यामार्फत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पाेहाेचण्याचा प्रयत्न केला अाहे. अाता प्रचारासाठी केवळ शेवटचे दाेन दिवस शिल्लक राहिले अाहे. केवळ ४८ तासांत जास्तीत जास्त मतदारांना अाकर्षित करण्याचे अाव्हान उमेदवारांसमाेर असणार अाहे. त्यादृष्टीने शेवटच्या दाेन दिवसाच्या प्रचार नियाेजनाची जबाबदारी ही खास मर्जीतील कार्यकर्त्यांवर संबंधित उमेदवारांकडून साेपवण्यात अाली अाहे. त्यात गुरुवारी सकाळी ८ वाजेपासूनच प्रभागातील विविध काॅलन्या, भागात प्रचारफेरी, दुपारच्या टप्प्यात मतदारांच्या गाठीभेटी, विविध समाज, मंडळ पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...