आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीनेटरवर अंडे फेकून मारणाऱ्या तरूणाने क्राइस्टचर्च हल्ल्यातील पीडितांसाठी दान केले 48 लाख रूपये

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनबरा- ऑस्ट्रेलियाचे सीनेटर फ्रेजर अॅनिंग यांच्यावर अंडे फेकणाऱ्या तरूणाने क्राइस्टचर्च मस्जिद हल्ल्यात ठार झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना 1 लाख ऑस्ट्रेलिया डॉलर (जवळपास 48 लाख रुपये) दान केले आहेत. अंडे फेकल्याच्या घटनेनंतर लोकांनी 17 वर्षाच्या विल कोनॉलीसाठी ऑनलाइन फंड गोळा केला होता. न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्चमध्ये झालेल्या हल्ल्यात 51 लोकांचा बळी गेला होता.

 

'एग बॉय' या नावाने प्रसिद्ध असलेल्या विल कॉनोलीने 'गो फंड मी पेज'या वेबसाइटद्वारे गोळा केलेली रक्कम दान केली. कॉनोलीने आपल्या इंस्टाग्रामवर सोमवारी रात्री याची माहिती दिली. त्याने यात लिहिले की, मी आज 99,922.36 ऑस्ट्रेलिअन डॉलर क्राइस्टचर्च फाउंडेशन आणि विक्टिम सपोर्ट संस्थेला पीडितांच्या मदतीसाठी दिले आहेत.
 
दान केलेली रक्कम पीडितांच्या मदतीसाठी
न्यूझीलंड येथील 'विक्टिम सपोर्ट'चे प्रवक्ता यांनी कॉनोलीकडून मिळालेल्या निधीची खात्री केली आहे. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन सो यांनी सांगितले की, दान मिळालेली रक्कम पीडितांसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. तसेच, न्युझीलंडच्या लोकांकडून मिळणाऱ्या सहानूभुतीमुळे त्यांचे आयुष्य सुधारण्यास मदत होईल.

 

15 मार्चला झाला होता गोळीबार
15 मार्च रोजी न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्चमध्ये असलेल्या अल-नूर आणि लिनवूड मस्जिदमध्ये गोळीबार झाला होता. या हल्ल्यात 51 लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे सिनेटरवर अॅनिंगने वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये मुस्लिम प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे काइस्टचर्चवर हल्ला झाला आहे असे विधान केले होते. त्यानंतर या वादग्रस्त विधानामुळे देशभरात त्यांच्यावर जोरदार टिका झाली.


वादग्रस्त विधानामुळे कॉनोलीने फेकले होते अंडे
विल कॉनोलीने यादरम्यान सीनेटरवर अंडे फेकले होते. त्यानंतर अॅनिंग यांनी मागे वळून कॉनोलीला धक्का दिला आणि समर्थकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पण नंतर तक्रार दाखल न करता त्याला सोडून देण्यात आले. या घटनेनंतर कॉलोनी जगभरात लोकप्रिय झाला.

बातम्या आणखी आहेत...