आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - महाराष्ट्रात शनिवारी मोठा राजकीय उपटफेर झाला. सकाळी 7:30 वाजता देवेंद्र फडणवीस (49) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. फडणवीस राज्याचे 28 वे मुख्यमंत्री बनले आहेत. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. फडणवीस नागपूर दक्षिण-पश्चि, मतदारसंघातून आमदार आहेत. राज्यातील 52 वर्षांच्या इतिहासात फडणवीस हे पहिलेच असे मुख्यमंत्री आहेत ज्यांनी या पदावर पाच वर्ष पूर्ण करून पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. यापूर्वी वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ राज्यभार सांभाळला होता.
देवेंद्र फडणवीस यांच्यापूर्वी काँग्रेसचे नेते वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री पदाचे पाच वर्ष पूर्ण करून पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले होते. 1963 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते. 1967 मध्ये दुसऱ्यांदा त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तिसऱ्यांदा पुन्हा 13 मार्च 1972 मध्ये ते राज्याचे मुख्यमंत्री बनले परंतु 1975 मध्ये आणीबाणी काळात त्यांना पदावरून पायउतार व्हाल लागले आणि शंकरराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री बनले. महाराष्ट्रात 1960 पासून 2014 पर्यंत 28 मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.