आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या तिमाहीत फोर-जी टॅब्लेट बाजारात ६२% वाढ, लेनोव्हो अव्वल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - वर्ष २०१९ च्या पहिल्या तिमाहीमध्ये भारतात फोर-जी टॅब्लेटच्या बाजारात ६२ टक्क्यांची वाढ झाली आहे. ही वाढ २०१८ च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेमध्ये आहे. ही माहिती सायबर मीडिया रिसर्चच्या अहवालात समोर आली आहे. २६ टक्क्यांची भागीदारीसह लेनोव्हो पहिल्या क्रमांकावर आहे. तर सॅमसंग (१७ टक्के) आणि आयबाॅल (१७ टक्के) संयुक्त स्वरूपात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ९ टक्के भागीदारीसह अॅपल तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुढील तिमाहीत सॅमसंगच्या बाजार भागीदारीत आणखी घट होण्याची शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. अलीकडच्या काळात सॅमसंगची नवीन टॅब्लेट लाँच करण्याची कोणतीच योजना नाही, तर दुसरीकडे २०१८ च्या अखेरच्या तिमाहीच्या तुलनेमध्ये २०१९ च्या पहिल्या तिमाहीमध्ये टॅब्लेटच्या बाजार भागीदारीत ११ टक्क्यांची घट झाली आहे.


आयआयजी सीएमआरच्या अॅनालिस्ट मेनका कुमारी यांनी सांगितले की, “फोल्डेबल स्मार्टफोन आल्याने भविष्यात टॅब्लेटच्या बाजारावर परिणाम होईल. सॅमसनने त्यांचा गॅलेक्सी फोल्ड स्मार्टफोन लाँच केला आहे. लवकरच हुवावे आणि मोटोरोलादेखील अशाच प्रकारचा फोन लाँच करणार आहे. स्मार्टफोनसह अल्ट्रा बुक (छोटे लॅपटॉप) देखील टॅब्लेट बाजारावर परिणाम करतील.’


सीएनआरच्या मॅनेजर कणिका जैन यांनी सांगितले की, टॅब्लेट अल्ट्राबुक आणि स्मार्टफोनच्या मधले डिव्हाइस आहे. स्मार्टफोनच्या स्क्रीन साइजमध्ये सतत वाढ आणि किमती कमी होत असल्याने टॅब्लेटची लोकप्रियता कमी झाली आहे, तर अल्ट्राबुकमध्ये टॅब्लेटच्या तुलनेमध्ये चांगले प्रोसेसर आणि रॅम असते. त्यामुळे हेदेखील टॅब्लेटला आव्हान देतात.’


टॅब्लेट बिझनेसमध्ये घट झाल्यामुळे डाटा विंडने अलीकडेच भारतातील दोन उत्पादन प्रकल्प बंद केले आहेत. येत्या काळातही टॅब्लेटच्या विक्रीत अशीच घट होण्याची शक्यता आहे.

 

बातम्या आणखी आहेत...