Home | Business | Gadget | '4K monitors' for gaming and movies

गेमिंग आणि चित्रपट पाहण्यासाठी हे ‘4K मॉनिटर्स’ ठरू शकतात उत्तम

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Feb 11, 2019, 09:52 AM IST

तुम्हाला ऑनलाइन गेम खेळण्याची किंवा सिनेमा पाहण्याची आवड असेल तर हे मॉनिटर्स आजमावू शकता

 • '4K monitors' for gaming and movies

  उत्तम गेमिंग आणि चित्रपट पाहण्यासाठी तुमच्याकडे ‘४ के मॉनिटर्स’ उपलब्ध असेल तर त्याचा आनंद द्विगुणित होतो. बेनक्यू कंपनीने डोळ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन १ एमएसचा रिस्पॉन्स टाइम, एचडीआर कंटेंट सपोर्ट, ३८४० x२१६० रिझोल्यूशनसह ४ के मॉनिटर लॉन्च केले आहे. भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या काही विशेष मॉनिटर्सची माहिती येथे देण्यात येत आहे.

  एसर प्रिडेटर
  या मॉनिटरचे रिझोल्युशन बेनक्यूप्रमाणेच आहे; पण थोडा जास्त अॅग्रेसिव्ह “गेमिंग” लूक देण्याबरोबरच ते एनव्हिडिया जी-सिंकशी कॉम्पॅटिबल आहे. त्याचा रिफ्रेश रेट 60 एचझेड असून, तो सेटअप व्हर्टिकलीही केला जाऊ शकतो. जे युजर्स एनव्हिडिया ग्राफिक कार्डसह पीसीवर गेमिंग करतात त्यांच्यासाठी एसर जी-सिंक मॉनिटर फीचर हे अत्यंत आवश्यक असलेले टूल आहे.

  एसर केजी २८१ चा २८ इंची मॉनिटर
  हा एलजी मॉनिटरपेक्षा थोडा महाग; पण आकारात मोठा आहे. त्यात सर्व बेल, व्हिसल्स उपलब्ध आहेत. शिवाय १ एमएसचा रिस्पॉन्स टाइम, ६० एचझेड रिफ्रेश रेट आणि एएमडी फ्री सिंक टेक्नोलॉजीसाठी सपोर्ट मिळतो. मात्र, त्याचे काही स्पीकर्स जास्तच सॉफ्ट आहेत.

  एसर प्रिडेटर झेड ३५ पी बीएमआयपीएचझेड
  या ४ के मॉनिटरची स्क्रीन ३५ इंच कर्व्ड १८०० आर अल्ट्रावाइड आहे. त्याचे रिझोल्युशन ३४४० x १४४० आहे. त्याचा १०० एचझेडचा रिफ्रेश रेट कोणत्याही ४ के पॅनलसाठी दुर्मिळ मानला जातो. एनव्हिडिया जी-सिंक सपोर्टसह येणारा हा मॉनिटर खूप महाग आहे.

  एलजी यूएचडी मॉनिटर :

  कमी बजेट असणाऱ्यांसाठी एलजीचा हा अल्ट्रा एचडी (यूएचडी) 4 के मॉनिटर उत्तम पर्याय आहे; पण त्यात एचडीआर सपोर्ट उपलब्ध नाही. त्यात आयपीएस पॅनल आणि साइज एसर वापरले असून, ते बेनक्यूपेक्षा ४ इंच लहान आहेत. अर्थात, हे गेमिंगसाठी फार उपयुक्त नाही. कारण त्यात रिस्पॉन्स टाइम ५ एमएसवर सेट होतो; पण कंटेंट पाहण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

Trending