आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 4th test of australia india from 24th january 2012

सेहवाग आणि सचिनसाठी दुर्लभ योग असलेली चौथी कसोटी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्‍ट्रेलिया आणि भारत यांच्‍यादरम्‍यान 24 जानेवारीपासून सुरू होणारा चौथ्‍या कसोटी सामना सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्‍यासाठी दुर्लभ योग घेऊन येणारा आहे. वीरेंद्र सेहवागची रास वृषभ आहे. त्‍याच्‍या राशीतील गुरू उच्‍च स्‍थानी असून मेष राशीवर लक्ष ठेवून आहे. सध्‍या गुरूच्‍या महादशेतून तो जात आहे. त्‍यातच गुरूमध्‍ये बुध आणि शुक्रचे अंतर बनले आहे. हाच योग सेहवागला फायदेशीर ठरणारा आहे. सेहवागला मालव्‍य योग बनत आहे. त्‍याचा शुक्र तुळ राशीमध्‍ये आहे. सद्यस्थितीत संघाला मजबूत करण्‍यासाठी हा योग चांगला आहे. ऑस्‍ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्‍लार्कचा शुक्र सुद्धा चांगला आहे. परंतु, भारतीय कर्णधाराचा गुरू त्‍याच्‍यापेक्षा श्रेष्‍ठ आहे.

उज्‍जैनचे ज्‍योतिषाचार्य मनीष शर्मा यांच्‍यामते, ऍडिलेडमध्‍ये होणारा सामना मंगळवारी सुरू होणार असून त्‍याचवेळेस श्रवण नक्षत्र येणार आहे. त्‍याची रास मकर असणार आहे. चंद्र सेहवागच्‍या राशीमध्‍ये नवव्‍या स्‍थानी तर मायकल क्‍लार्कच्‍या अकराव्‍या स्‍थानी असेल. चंद्रपक्षाच्‍या आधारे दोघे समान दर्जाचे आहेत. गुरू आणि शुक्रापासूनही दोघे बरोबर आहेत. भारत आणि क्लार्कवर सध्या शनीच्या अडीचणीची छाया आहे. मात्र ऑस्ट्रेलियाची मेष रास सध्या बलवान स्थितीत आहे. त्‍यामुळेच ते हा सामना जिंकू शकतात. परंतु, हा सामना त्‍यांच्‍यासाठी सहज असणार नाही. सेहवागकडून चांगली खेळी होण्‍याची शक्‍यता आहे.

सचिनचे महाशतक बनणार!
हा सामना मंगळवारी होणार आहे आणि सचिनचा जन्‍मवार देखील मंगळवारच आहे. मंगळाची मित्र राशी सिंह असून त्‍यामध्‍ये गोचर योग बनत आहे. त्‍यामुळे त्‍याच्‍या पराक्रमात वाढ होईल. हा सामना मकर राशीत सुरू होणार आहे. त्‍याचा स्‍वामी शनी आहे. सद्यस्थितीत तो उच्‍च आहे. सचिनच्‍या कुंडलीत शनी मित्र राशी असल्‍यामुळे धावा जमवण्‍यास त्‍याला मदत मिळणार आहे.

पं. शर्मांच्‍या मते सचिनची राशी धनूच्‍या गुरू दृष्टिमध्‍ये बनली आहे, त्‍यामुळे सामन्‍यादरम्‍यान गुरूवारी त्‍याला मोठे यश मिळेल. सचिनच्‍या राहूच्‍या महादशेमध्‍ये केतूत सूर्याचे अंतर सुरू होत आहे. सूर्याने नुकतेच मकर राशीत प्रवेश केला आहे. शनी राहूच्‍या मित्रत्‍वामुळे सूर्य त्‍याच्‍याकडून मोठे विक्रम नोंदवून घेऊ शकतो.
शुक्र ग्रहामुळे २०१२ वर्षात आमिरला मिळेल भरभरून यश
धनु, मकर आणि कुंभ राशीत शुक्र ग्रह असेल तर आयुष्य कसे राहते?