आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटप्रेमींसाठी बॉलिवूडमध्ये बनले या खेळावर आधारित 'लगान', 'इकबाल' असे एकूण 5 चित्रपट  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप गुरुवारपकसुन सुरु झाले आहे. 5 जूनला भारत आपली पहिली मॅच दक्षिण भारताविरुद्ध खेळणार आहे. वर्ल्ड कप पूर्ण 45 दिवस चालणार आहे आणि ही वेळ क्रिकेट प्रेमींसाठी खूप छान असणार आहे. पण यादरम्यान सिनेमागृहात शांतता पसरण्याची शक्यता आहे. भारतामध्ये क्रिकेटप्रेमी चित्रपट प्रेमींपेक्षा जास्त आहेत आणि क्रिकेटपुढे ना सुपरस्टार टिकतो आणि ना मेगास्टार. याच क्रेजला पाहून बॉलिवूडमध्ये या खेळावर आधारित अनेक चित्रपट आले आहेत. एक नजर टाकुयात त्या चित्रपटांवर जे क्रिकेटवर बनलेले आहेत. 

 

क्रिकेटवर बनलेले हे चित्रपट... 
लगान (2001)... 

2001 मध्ये आलेला चित्रपट आमिर खानचा 'लगान' हा एक पीरियड ड्रामा चित्रपट होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केले आहे. चित्रपट अकॅडमी अवॉर्डसाठी नॉमिनेट केला गेला होता.  

 

इकबाल (2005)... 
'इकबाल' चित्रपटदेखील क्रिकेटवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागेश कुकुनूर यांनी केले होते. या चित्रपटांत श्रेयस तळपदे 'इकबाल'च्या रोलमध्ये होता. त्याने एका अशा मुलाची भूमिका साकारली होती जो बहिरा आहे. पण त्याला क्रिकेट खेळण्याची विशेषतः बॉलर बनण्याची आवड असते. त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नसीरुद्दीन शाह इकबालची मदत करतात. नसीरुद्दीन हे या चित्रपटात माजी क्रिकेटर दाखवले गेले आहेत. चित्रपटात कपिल देव कॅमियो रोलमध्ये दिसले होते. 

 

एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी (2016)... 
ही भारतीय क्रिकेटर आणि माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची बायोपिक आहे. चित्रपटांत एम एस धोनीची क्रिकेटर बनण्याची आणि भारतीय टीमला त्याच्या कॅप्टनशिपमध्ये वर्ल्ड कप जिंकण्याची कहाणी दाखवली गेली आहे.  

 

अजहर (2016)... 
हेदेखील भारतीय क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीन यांच्या जीवनावर आधारित चित्रपट होता. अजहरुद्दीन जे क्रिकेटच्या जगातील अजहरच्या नावाने ओळखले जात होते. चित्रपटात अजहरचे खाजगी आयुष्य आणि क्रिकेट करियर दाखवले गेले आहे.  

 

सचिन : अ बिलियन ड्रिम्स (2017)... 
क्रिकेटचा देव म्हणवल्या जाणाऱ्या सचिनच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफवर आधारित डॉक्यूड्रामा आहे. सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण त्याच्या फॅन्ससाठी हा चित्रपट एखाद्या गिफ्टपेक्षा कमी नाही.  

बातम्या आणखी आहेत...