Home | National | Modi 3 Years | 5 Boys stripped a Girl and make video in MP, arrested after video goes viral

अरण्यात फिरण्यासाठी गेलेल प्रेमीयुगुलाला 5 तरुणांनी पकडले, तरुणीला काढायला लावला स्कर्ट- प्रेयसीला बाहुपाशात घेऊन सोडून देण्याची भीक मागत होता युवक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 12, 2019, 12:02 AM IST

काहींनी इथे-तिथे स्पर्श केला, तर काहींनी बळजबरीचा प्रयत्न... व्हिडिओ व्हायरल होताच राज्यभरात खळबळ

 • दमोह (मध्य प्रदेश) - नोहटा परिसरातील चिरईचोंच जवळील हथनी नर्सरीत एक युवक आणि तरुणीला 5 नराधमांनी आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. आधी त्यांना बेदम मारहाण करून तरुण आणि तरुणीचा व्हिडिओ बनवला. मग तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या व्हिडिओत तरुणी अर्धनग्नावस्थेत असून नराधम तिचे आणखी कपडे उतरवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कुटुंबीयांपर्यंत या घटनेची माहिती गेली तेव्हा त्यांनी एसपींचे कार्यालय गाठून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध 7 कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तिघांना अटकही केली आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी दमोहच्या एसपींना भेटून आरोपींविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे.


  तरुणीचे उतरवले कपडे, पकडून करू लागले अश्लील कृत्य
  जबलपूर नाका ठाण्याचे प्रभारी राघवेंद्र कमरिया म्हणाले की, नोहटा परिसरातील चिरईचोंच जवळ हर्ष नावाचा तरुण एका तरुणीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत होता. यादरम्यान तेथे 5 बदमाश तरुणांनी त्यांना पकडले. आपल्या मोबाइलमध्ये त्यांचा व्हिडिओही बनवला. आरोपींपैकी काहींनी आपल्या तोंडावर कपडा बांधला होता. ते म्हणाले की, सर्व आरोपी मुलीचा अर्धनग्नावस्थेतील व्हिडिओ बनवून तिच्याशी अश्लील कृत्य करत होते. पीडिता असे न करण्याची विनवणी करत होती, परंतु तरीही आरोपींनी तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा तपास सीएसपी आलोक शर्मा करत आहेत.

  7 कलमांमध्ये गुन्हा दाखल
  पोलिसांनी सांगितले की, हर्ष नावाच्या तरुणासहित 5 अज्ञातांविरुद्ध 7 कलमांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात कलम 354 छेड़छाड़, कलम 292 व्हिडिओ बनवून व्हायरल करणे, कलम 506 जिवे मारण्याची धमकी देणे, कलम 323 मारहाण करणे, कलम 342 वाट अडवणे, कलम 384 व्हिडिओ बनूवन पैशांची मागणी करणे आणि 7/8 पॉस्को अॅक्टही सामील आहे. पकडण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे इरफान खान, आरिफ खान आणि अफझल खान अशी आहेत.

  सामाजिक संघटनांचा उठाव, व्हिडिओ हटवण्याची अपील
  सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी सामाजिक संघटनांनी एसपी कार्यालयात पोहोचून निवेदन सोपवले. संघटनांनी सांगितले की, व्हिडिओत प्रेमीयुगुल नोहटा परिसरातील जंगलात अशोभनीय स्थितीत दिसत आहेत, या युगुलासोबत काही तरुण अभद्रता करताना दिसत आहे. विश्व हिंदू परिषद महाकौशल प्रांत, बजरंग दलसहित भाजप कार्यकर्त्यांनी एसपी कार्यालयात पोहाचून निवदेन दिले. सोबत हा व्हिडिओ डिलिट करण्याचेही आवाहन केले आहे.

Trending