Home | National | Other State | 5 candidates contest in election from Mulayam Familiy

मुलायम परिवारातील पाच चेहरे निवडणुकीच्या रिंगणात, काका-पुतण्यामध्ये होणार लढत

दिव्य मराठी | Update - Apr 21, 2019, 04:49 PM IST

काँग्रेसने तीन जागांवर उमेदवार दिले नाहीत

 • 5 candidates contest in election from Mulayam Familiy

  दिव्यमराठी ग्राउंड रिपोर्ट- मथुरेतून मैनपुरीत येत असताना राज्यातील सर्वात प्रभावशाली राजकीय व्यक्तीच्या परिवाराच्या उपस्थितीचा अनुभव सुरू हाेताे. तीन दशकांपासून उत्तर प्रदेशातील राजकारणात दबदबा ठेवणाऱ्या मुलायम परिवाराने २०१४ मध्ये माेदी लाट असतानाही पाच जागा जिंकल्या हाेत्या. २०१९ मध्ये या परिवाराच्या प्रभावाची परीक्षा आहे. कारण प्रथमच या परिवारात फूट पडली आहे. परिवारातील सदस्य समाेरासमाेर आहेत. मैनपुरी, एटा, फिराेजाबाद आणि बदायूं मतदारसंघात निवडणुकीचा तिसरा टप्पा २३ एप्रिल राेजी आहे. कन्नाेज मतदारसंघात चाैथ्या टप्प्यात २९ एप्रिल राेजी मतदान हाेणार आहे. परिवाराचे प्रमुख व समाजवादी पक्षाचे संरक्षक मुलायमसिंह यादव मैनपुरीहून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांचे लहान भाऊ शिवपालसिंह यादव बंडखोरी करून फिराेजाबादहून लढणार आहेत. त्यांचा सामना पुतणे अक्षय यादव यांच्याशी आहे. बदायूंत मुलायमसिंह यांचे दुसरे पुतणे धर्मेंद्र यादव व सून डिंपल यादव कन्नाेज मतदारसंघातून मैदानात आहेे. परिसरात परिवारवाद दिसून येत आहे.

  एटामध्ये राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंह यांचा मुलगा राजवीर सिंह निवडणूक रिंगणात आहे. ते भाजपच्या तिकिटावर एटा-कासगंज येथून निवडणूक रिंगणात आहेत. परिवारातील आणखी एक सदस्य अखिलेश यादव येथून ५२० किमी लांब वडिलांच्या आझमगड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.


  धान्याचा व्यवसाय करणारे वेदपालसिंह परमार म्हणाले, ‘विकास, राेजगारसाेबत एअर स्ट्राइक व न्याय हे महत्त्वाचे मुद्दे आहे. मैनपुरी भाजप कार्यालयात बसलेले भाजप उमेदवार प्रेमसिंह शक्य म्हणाले, ‘जातीय गणित व परिवारवादास यंदा माेदी फॅक्टर पराभूत करेल. माेदी यांनी पाच वर्षांत केलेली कामे लाेकांसमाेर आहेत. तसेच सपाच्या राज्यात गुंडागर्दी झाली. लाेक ते विसरलेले नाहीत.’

  फिराेजाबादमध्ये रोमहर्षक लढत आहे. शिवपाल यादव आपल्या प्रगतशील समाजवादी पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांच्याविराेधात रामगाेपाल यादव यांचा मुलगा व अक्षय आहे. बहुजन समाज पक्षासाेबत असल्याने अक्षयचे आव्हान साेपे झाले आहे. परंतु समाजवादी पक्षाकडून बंडखोरी केलेले हरिआेम यादव व अजीमभाई यांनी सपाला रामराम ठाेकत शिवपालचा गट सांभाळला आहे. यातील अजीम यांची मुसलमानांवर चांगली पकड आहे. फिराेजाबादमध्ये मुलायम परिवारातील काेणत्यान् काेणत्या सदस्याची नातेवाईक आहे. मुलायम यांचे व्याही रामप्रकाशन नेहरू शिकाेहाबाद पालिकेचे माजी नगराध्यक्ष आहेत. ते शिवपाल यांचा प्रचार करत आहेत. नेहरू यांचे भाऊ व सिरसागंजचे सप आमदार हरिआेम हेसुद्धा शिवपाल यांच्यासाेबत आहेत.

  काँग्रेसने तीन जागांवर उमेदवार दिले नाहीत
  उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष व बसप साेबत आहे. सर्व पाच जागांवर सप लढत आहे. यादव परिवारातील उमेदवार असल्याने काँग्रेसने कन्नाेज, मैनपुरी व फिराेजाबादमधून उमेदवार दिले नाहीत. तसेच एटा-कासगंजची जागा जनअधिकारी पक्षाला दिली आहे. या भागात भाजपची काेणाशी युती नाही. या पाचही जागांवर परिवार सर्वात माेठा मुद्दा आहे. विकास, राेजगार, शेतकऱ्यांची परिस्थिती, एअर स्ट्राइक या राष्ट्रीय मुद्द्यांबरोबर स्थानिक मुद्देही प्रचारात आहेत. कन्नाेजमधील व्यापाराची परिस्थिती खराब आहे, परंतु त्याची चर्चा नाही.

Trending