आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न निष्फळ; ५ अतिरेक्यांचा खात्मा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर- पाकव्याप्त काश्मीर(पीओके)कडून होणारा घुसखोरीचा मोठा प्रयत्न सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे निष्फळ ठरला. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात तंगधारमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चकमकीत पाच अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. या कारवाईत लष्कराचा एक जवान शहीद झाला. 


संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांच्यानुसार, पीओकेच्या बाजूने अतिरेकी रविवारी घुसखोरी करण्याच्या तयारीत होते. जवानांनी त्यांना आव्हान देऊन शरण येण्यास सांगितले. मात्र, त्यांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईत लष्कराने सडतोड उत्तर दिले. त्या वेळी अतिरेकी पळून जाण्यात यशस्वी ठरल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. या वेळी झालेल्या कारवाईत दोन अतिरेकी मारले गेले. अंधार पडल्यानंतर रविवारी रात्री मोहीम रोखण्यात आली. सोमवारी अतिरेक्यांची माहिती मिळाली व गोळीबारात आणखी तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. यामध्ये एक जवान शहीद झाला. लष्करी प्रवक्त्याने सांगितले की, बर्फवृष्टी सुरू होण्याआधी मोठ्या प्रमाणात अतिरेकी घुसखोरीच्या प्रयत्यान आहेत. 


उत्तर काश्मीरमध्ये अपहृत व्यक्तीची हत्या 
उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सोमवारी सोपोरमध्ये सफरचंदाच्या बागेतून अपहरण केलेल्या व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. सूत्रांनुसार, २२ सप्टेंबरला रात्री एक बंदूकधारी सोपोरच्या हरवानमध्ये मुश्ता अहमद मीर यांच्या घरी घुसला व त्याचे अपहरण केले होते. मीरचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी मोहीम राबवली. यादरम्यान बागेत त्याचा मृतदेह आढळला. 

बातम्या आणखी आहेत...