आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापसाला ५ हजारी भावाची हमी, दसऱ्यानंतर शासकीय खरेदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शासनाने कापसाच्या किमान अाधारभूत किंमती(एमएसपी)मध्ये प्रथमच भरघाेस वाढ केली अाहे. शासकीय खरेदी केंद्रावर यावर्षी ५१५० ते ५४५० रूपये हमी भावाने कापूस खरेदी केला जाणार अाहे. राज्य शासनाने नाेटीफिकेशन प्रसिद्ध केल्यानंतर कापूस खरेदीची प्रक्रिया सुरू केली जाणार अाहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत कापसाच्या दरात ११३० रुपयांची वाढ करण्यात अाली अाहे. दसऱ्यानंतर महासंघाच्या केंद्रावर कापूस खरेदी सुरू करण्याचे प्रयत्न असल्याची माहिती राज्य कापूस पणन महासंघाचे संचालक संजय पवार यांनी 'दिव्य मराठी'शी बाेलताना दिली. 


कापूस पणन महासंघाने राज्यात कापूस उत्पादक ६० तालुक्यांमध्ये ६० ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू करण्याची तयारी केली अाहे. महासंघाचे सीसीअाय सब एजंट म्हणून कापूस खरेदी करेल. कापूस उत्पादकांना चांगला भाव मिळावा, यासाठी महासंघाने यावर्षी शासनाकडे भाववाढीचा प्रस्ताव दिला हाेता. केंद्राने विविध शेतमालांच्या अाधारभूत किंमती जाहीर करताना यावर्षी कापसाच्या भावात ११३० रुपयांची भरघोस वाढ केली अाहे. त्यामुळे यंदा शासकीय केंद्रावर कापसाला ५१५० ते ५४५० एवढा हमी भाव मिळणार अाहे. पणन महासंघाची खरेदी ५ हजारापेक्षा जास्त भावाने हाेणार असल्याने खासगी बाजारात कापसाचे दर ५५०० पेक्षा जास्त टिकून राहतील. राज्य शासनाकडून कापूस खरेदीची नाेटीफिकेशन प्रसिद्ध केल्यानंतर पणन महासंघ पुढील प्रक्रिया करेल. दसऱ्यानंतर खरेदी केंद्र सुरू करावे, असे पणन महासंघाचे प्रयत्न असल्याची माहिती संचालक संजय पवार यांनी दिली. 


बाेनससाठी प्रयत्न 
गत अाठवड्यात महासंघाच्या अध्यक्षा उषा शिंदे, उपाध्यक्ष प्रसेनजित पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत महासंघाची बैठक पार पडली. या बैठकीत कापूस खरेदी संदर्भात अाढावा घेण्यात अाला. शासनाने कापसाला भाववाढ दिली अाहे. शासकीय खरेदी केंद्रावर येणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ५०० रूपये बाेनस देण्याची मागणी महा संघामार्फत शासनाकडे करण्यात येणार अाहे. 


जळगाव विभागात ८ खरेदी केंद्रे : जळगाव विभागात सीसीअाय अाणि पणन महासंघ असे वेगवेगळे खरेदी केंद्र असतील. महासंघाचे धरणगाव, यावल, मुक्ताईनगर, अमळनेर, पाराेळा, धुळे, मालेगाव अाणि येवला येथे खरेदी केंद्र असतील. इतर अाठ ठिकाणी सीसीअायची खरेदी हाेईल. 


भाववाढीचा दिलासा : यावर्षी पणन महासंघ ५१५० ते ५४५० या भावाने कापूस खरेदी करणार अाहे. कापसाला ५ हजार रूपये हमीची खरेदी असल्याने बाजारपेठेत ५५०० रूपयांपेक्षा अधिक भाव मिळणार अाहे. शासकीय हमी भावाचा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याने कापसाची बाजारपेठ तेजीत राहिल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात अाहे. 

बातम्या आणखी आहेत...