आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केन्यातील पार्कमध्ये अचानक आला पूर, 5 भारतीय पर्यटकांसहित 6 जणांचा मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नैरोबी- केन्यातील नेवाशा शहरात रविवारी अचानक आलेल्या पूरामुळे 5 भारतीय पर्यटक आणि एक स्थानीक टूर गाइडचा मृत्यू झआाल आहे. वृत्तसंस्था सिन्हुआने रिफ्ट वॅलीचे क्षेत्रीय पोलिस कमांडर मार्कस ओचोला यांच्या माहितीनुसार सांगितले की, घटना हेल्स गेट नॅशनल पार्कमध्ये झाली. अचानक आलेल्या पूरामुळे पर्यटकांची व्हॅन पाण्यात बुडाली.

ओचोलाने सांगितले की, टूर गइडला त्या परिसरातील वातावरणाचा अंदाज आला नसावा. आम्हाला माहिती आहे की, पूराचे पाणी उंच ठिकाणावरुन निघते. पण या अपघातादरम्यान घटनेचा अंदाज लावता आला नाही. तुर्तास आम्ही वाचलेल्या नागरिकांचा शोध घेत आहोत.

रेस्क्यू ऑपरेशनमध्ये येत आहे अडथळे
अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटना रविवारी स्थानीक वेळेनुसार संध्याकाळी चार वाजत घडली. ओचोलाने सांगितले की, पुरातील पाण्याची उंची खूप असल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळे येत आहेत. वाचलेल्या पर्यटकांच्या शोधासाठी अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आला आहे.