Today's Horoscope / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

अशुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात, जाणून घ्या आज काय लिहिले आहे तुमच्या राशीत कसा राहील दिवस

रिलिजन डेस्क

Jul 05,2019 12:20:00 AM IST

शुक्रवार, 5 जुलै 2019 रोजी 12 पैकी 6 राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. आजच्या दिवशी आश्लेषा नक्षत्रामुळे वज्र नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. यामुळे सहा राशीच्या लोकांना धनहानीला सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम बिघडू शकते. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. काही निर्णय चुकीचे ठरू शकतात. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

मेष : शुभ रंग : तांबडा | अंक : १ वास्तू व वाहन खरेदीच्या कामातील अडथळे दूर होतील. कलेच्या क्षेत्रातील मंडळींना स्ट्रगल करावी लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्व कळेल.वृषभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३ प्रॉपर्टी खरेदी विक्रिचे व्यवहार टाळलेले बरे. एखाद्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. कामाच्या व्यापात कुटुंबियांना वेळ देणे अशक्य होईल.मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : ५ कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल. आज आर्थिक बाजू भक्कम राहील. मोठी खरेदी कराल. महत्वाच्या वाटाघाटीत आपली बाजू प्रभावीपणे मांडू शकाल.कर्क : शुभ रंग : मोतिया | अंक : ९ आळस झटकून कामाला लागाल, परंतू अती उत्साहाच्या भरात काही चुकीचे निर्णय घ्याल असलेला पैसा जपून वापरा. कुणाला शब्द देऊ नका.सिंह : शुभ रंग : चंदेरी | अंक : ७ काम सोडून काही निरर्थक वादविवादात वेळ खर्च होण्याची शक्यता आहे. आज आपल्या काही तत्वांना मुरड घालावी लागेल. प्रवासात झोपून चालणार नाही.कन्या : शुभ रंग : जांभळा | अंक : २ दुरावलेले नातलग एकत्र येतील. मित्र अश्वासने पूर्ण करतील. नव्या योजना वेग घेतील. इच्छापूर्तीचा दिवस असल्याने फक्त शुभच चिंता. दैव तुमच्याच बाजूने.तूळ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ४ भावना व कर्तव्य याचा समन्वय साधावा लागणार आहे. कामाच्या ठीकाणी हितशत्रू तुमच्या चुका शोधायचा प्रयत्न करतील. आज संयम ढळू देऊ नका.वृश्चिक : शुभ रंग : निळा | अंक : ८ सरकार दरबारी रखडलेल्या कामांसाठी वशिला शोधावाच लागेल. अधिकारी वर्गास हाताखालच्या लोकांची नाराजी पत्करावी लागेल. प्रतिकूल दिवस.धनू : शुभ रंग : पिस्ता | अंक : ६ आज विश्रांती गरजेची आहे. केवळ भिडस्तपणा पायी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारू नका. अती काबाड कष्ट तब्येत बिघडण्यास कारणीभूत होतील.मकर : शुभ रंग : केशरी | अंक : ३ कामाच्या व्यापात स्वत:च्या आवडी निवडी दुर्लक्षित होतील. रिकामटेकडया गप्पांतून वादविवाद निर्माण होतील. वैवाहीक जिवनांत जोडीदारास समजून घ्या.कुंभ : शुभ रंग : मरून | अंक : १ आज तुम्हाला काही आरोग्याच्या तक्रारी त्रस्त करतील.रुग्णांनी पथ्यपाणी पाळणे गरजेचे आहे. काही येणी असल्यास वसूल होऊ शकतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश.मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : ९ कलाकार मंडळी प्रसिध्दीच्या झोतात राहतील.चैन करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आज स्वत:च्या आवडी निवडीस प्राधान्य द्याल.

मेष : शुभ रंग : तांबडा | अंक : १ वास्तू व वाहन खरेदीच्या कामातील अडथळे दूर होतील. कलेच्या क्षेत्रातील मंडळींना स्ट्रगल करावी लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्व कळेल.

वृषभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३ प्रॉपर्टी खरेदी विक्रिचे व्यवहार टाळलेले बरे. एखाद्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. कामाच्या व्यापात कुटुंबियांना वेळ देणे अशक्य होईल.

मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : ५ कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल. आज आर्थिक बाजू भक्कम राहील. मोठी खरेदी कराल. महत्वाच्या वाटाघाटीत आपली बाजू प्रभावीपणे मांडू शकाल.

कर्क : शुभ रंग : मोतिया | अंक : ९ आळस झटकून कामाला लागाल, परंतू अती उत्साहाच्या भरात काही चुकीचे निर्णय घ्याल असलेला पैसा जपून वापरा. कुणाला शब्द देऊ नका.

सिंह : शुभ रंग : चंदेरी | अंक : ७ काम सोडून काही निरर्थक वादविवादात वेळ खर्च होण्याची शक्यता आहे. आज आपल्या काही तत्वांना मुरड घालावी लागेल. प्रवासात झोपून चालणार नाही.

कन्या : शुभ रंग : जांभळा | अंक : २ दुरावलेले नातलग एकत्र येतील. मित्र अश्वासने पूर्ण करतील. नव्या योजना वेग घेतील. इच्छापूर्तीचा दिवस असल्याने फक्त शुभच चिंता. दैव तुमच्याच बाजूने.

तूळ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ४ भावना व कर्तव्य याचा समन्वय साधावा लागणार आहे. कामाच्या ठीकाणी हितशत्रू तुमच्या चुका शोधायचा प्रयत्न करतील. आज संयम ढळू देऊ नका.

वृश्चिक : शुभ रंग : निळा | अंक : ८ सरकार दरबारी रखडलेल्या कामांसाठी वशिला शोधावाच लागेल. अधिकारी वर्गास हाताखालच्या लोकांची नाराजी पत्करावी लागेल. प्रतिकूल दिवस.

धनू : शुभ रंग : पिस्ता | अंक : ६ आज विश्रांती गरजेची आहे. केवळ भिडस्तपणा पायी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारू नका. अती काबाड कष्ट तब्येत बिघडण्यास कारणीभूत होतील.

मकर : शुभ रंग : केशरी | अंक : ३ कामाच्या व्यापात स्वत:च्या आवडी निवडी दुर्लक्षित होतील. रिकामटेकडया गप्पांतून वादविवाद निर्माण होतील. वैवाहीक जिवनांत जोडीदारास समजून घ्या.

कुंभ : शुभ रंग : मरून | अंक : १ आज तुम्हाला काही आरोग्याच्या तक्रारी त्रस्त करतील.रुग्णांनी पथ्यपाणी पाळणे गरजेचे आहे. काही येणी असल्यास वसूल होऊ शकतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश.

मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : ९ कलाकार मंडळी प्रसिध्दीच्या झोतात राहतील.चैन करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आज स्वत:च्या आवडी निवडीस प्राधान्य द्याल.
X
COMMENT