आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१० तासांच्या प्रयत्नाने डॉक्टरांनी काढला ५ किलोंचा ब्रेन ट्यूमर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिंडीगुल - तामिळनाडूच्या डिंडीगुलमध्ये सर्जन डॉ. जे. श्रीसरवनन यांनी दहा तास शस्त्रक्रिया करून जगातील सर्वात मोठा ब्रेन ट्यूमर काढला. ट्यूमरचे वजन सुमारे ५ किलो होते. जगातील हा सर्वात मोठा ट्यूमर असल्याचा डॉक्टरांचा दावा आहे. डॉक्टरांनी सांगितले, डिंडीगुल येथील शक्तीवेलू नावाच्या व्यक्तीस गेल्या २० वर्षापासून ब्रेन ट्यूमर होता. जीवाला धोका होईल, या भितीपोटी त्याने उपचार घेणे सोडून दिले. यामुळे त्याचा ट्यूमर वाढत चालला हाेता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसापूर्वी तो डॉ. श्रीसरवनन यांच्याकडे गेला. प्राथमिक तपासण्यानंतर ७ डॉक्टरांच्या पथकाने त्याच्या ट्यूमरवर शस्त्रक्रिया केली. श्रीसरवनन यांनी सांगितले, तेव्हा त्याच्याा ट्यूमरचा आकार डोक्याइतका होता. 

बातम्या आणखी आहेत...