आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन् लागला मृतदेहांचा खच! Platform वर गर्दी पाहून राँग साइडने उतरले प्रवासी, तेवढ्यात रुळावर आली भरधाव ट्रेन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैमूर - बिहारच्या कैमूर जिल्ह्यातील भभुआ रोड स्टेशनवर शुक्रवारी संध्याकाळी एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. येथे लोक रुळावर येऊन प्लॅटफॉर्म बदलण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी एक भरधाव रेल्वे आली. अचानक झालेल्या या भीषण दुर्घटनेत अनेक जण चिरडले गेले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण जखमी झाले. त्यापैकी 5 जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. हे सगळेच वाराणसी-रांची इंटरसिटी एक्सप्रेसमधून उतरून भभुआ रोड स्टेशनवर रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न करत होते असे सांगितले जात आहे.


मुगलसरायचे विभागीय रेल्वे मॅनेजर पंकज सक्सेना यांनी सांगितल्याप्रमाणे, शुक्रवारी संध्याकाळी पावणे सहा वाजता ही घटना घडली. अपघातातील पीडित पायी किंवा धावून रेल्वे प्लॅटफॉर्म पार करण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी भरधाव वेगाने लालकुआ एक्सप्रेस रुळावर आली. घाई गर्दीत अनेक जण ट्रेन पाहूच शकले नाही. परिणामी ट्रेन त्या गर्दीवरून निघून गेली. मृतांमध्ये 4 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.


चुकीच्या दिशेने उतरले होते प्रवाशी
स्टेशन मास्टर सरोज सिंह यांनी सांगितले, की अपघाताचा बळी ठरलेले लोक वाराणसी ते रांचीला जाणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेसमधून भभुआ रोड स्टेशनवर उतरले होते. भभुआमध्ये ही ट्रेन एक तास उशीराने आली होती. त्यामुळे, ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर मोठ्या संख्येने लोक गोळा झाले होते. अशात उतरणाऱ्यांनी शॉर्ट कट म्हणून चुकीच्या दिशेने उतरण्याचा निर्णय घेतला. परंतु, याच शॉर्ट कटच्या नादात त्यांचा जीव गेला. त्यांनी स्टेशनवर असलेला ओव्हरब्रिज वापरला असता तर कदाचित ते वाचले असते. जी एक्सप्रेस ट्रेन रुळावर आली ती त्या स्टेशनला थांबणार नव्हती. म्हणूनच भरधाव वेगाने ती ट्रेन लोकांना चिरडून गेली. 

बातम्या आणखी आहेत...