आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाझियाबादमध्ये गटार साफ करताना 5 मजुरांचा गुदमरुन मृत्यू, कंत्राटदार घटनास्थळावरुन फरार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाझियाबाद(उत्तर प्रदेश)- गाझियाबादच्या नंदग्राम परिसरात आज(गुरुवार) नाल्याची सफाई करण्यासाठी आत गेलेल्या 5 मजुरांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तुर्तास मृतांची ओळख पटलेली नाहीये. स्थानिकांनी सांगितले की, हे मजुर कोणत्याही सुरक्षा उपकरणाशिवाय आत उतरले होते. घटनेनंतर स्थानिकांनी एका मजुराचा मृतदेह बाहेर काढला आणि पोलिस आल्यानंतर त्यांनी इतरांचे मृतदेह काढले. दरम्यान, सफाईचे कंत्राट घेणार कंत्राटदार फरार आहे.

कंत्राटदाराच्या सांगण्यावरुन मजुर आत उतरले होते
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व मजुर कंत्राटदाराच्या सांगण्यावरुन सफाई करण्यासाठी आत उतरले होते. सुरुवातील एक तरुण आत गेला, खूप वेळ झाला तरीदेखील तो परत न आल्याने दुसरा मजुर आत गेला. त्यानंतर इतर तिघे गेले, पण कोणीही बाहेर आले नाही.

पोलिसांनी स्थानकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले
घटनेनंतर स्थानिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी स्थानकांच्या मदतीने सर्व मजुरांचे मृतदेह बाहेर काढले. तोपर्यंत सर्वांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, पोलिस मृतांची ओळख पळवण्याचे आणि कंत्राटदाराला पकडण्याचे काम करत आहे.

मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी 10 लाखांच्या मदतीची घोषणा केली
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गाझियाबाद मध्ये नाले सफाई दरम्यान झालेल्या 5 मजुरांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला. तसेच प्रत्येकाच्या कुटुंबीयांना 10-10 लाख मदतीची घोषणा केली. तसेच घटनेची चौकशी करुन दोन दिवसात रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...