सण-उत्सव / आज आवळा नवमी, या तिथीला पाण्यामध्ये आवळा रस टाकून स्नान करण्याची प्रथा

पंचांगानुसार कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील नवमीला अक्षयनवमी असेही म्हणतात

रिलिजन डेस्क

Nov 05,2019 12:15:00 AM IST

मंगळवार 5 नोव्हेंबरला कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. या तिथीला आवळा नवमी असेही म्हटले जाते. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. धार्मिक मान्येनुसार, जे लोक या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करतात, त्यांना देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते.

  • आवळा नवमीच्या दिवशी सकाळी स्नानाच्या पाण्यामध्ये आवळ्याचा रस टाकून स्नान करावे. यामुळे आपल्या जवळपास असलेली सर्व नकारात्मक उर्जा नष्ट होऊन सकारात्मक उर्जा वाढते. अशाप्रकारे स्नान केल्यानंतर देवी लक्ष्मी आणि आवळा वृक्षाची पूजा करावी.

  • आवळा नवमी संदर्भात एक कथा प्रचलित आहे की, प्राचीन काळी कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला देवी लक्ष्मीने आवळ्याच्या झाडाखाली महादेव आणि श्रीविष्णू यांची पूजा केली होती. तेव्हापासून या तिथीला आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा सुरु झाली.

  • आयुर्वेदानुसार आवळा शरीरासाठी एक वरदानच आहे. याच्या नियमित सेवनाने आयुष्य वाढते, तारुण्य कायम राहते आणि आजारांपासून संरक्षण होते. शास्त्रात सांगण्यात आले आहे की, आवळ्याच्या रसाचे नियमित सेवन केल्यास पुण्यामध्ये वाढ होते आणि पाप नष्ट होतात. आवळ्याला पवित्र आणि पूजनीय मानले गेले आहे. पंचांगानुसार कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील नवमीला अक्षयनवमी असेही म्हणतात. आवळ्याच्या सेवनानंतर कमीतकमी दोन तासापर्यंत दुध चुकूनही पिऊ नका.
X
COMMENT