आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवीतील मुलीवर अत्याचार; 5 अटकेत, काकानेच केला होता पहिल्यांदा बलात्कार 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- हराळी (ता. लोहारा) येथील ज्ञानप्रबोधिनी निवासी शाळेत आठवीत शिकणाऱ्या व आई-वडील नसलेल्या मुलीवर तिच्या काकासह (मावशीचा नवरा) शाळेचे दोन शिक्षक, सुरक्षा रक्षक, शिपाई आणि शेतात काम करणाऱ्या कामगारांनी अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या जबाबावरून ६ जणांवर लोहारा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून ५ जणांना अटक झाली आहे. न्यायालयाने आरोपींना ७ दिवसांची कोठडी सुनावली आहे. दरम्यान, गावकऱ्यांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या या निवासी शाळेत वास्तव्य आणि शिकणाऱ्या मुलीवर शिक्षक दत्ता जमदाडे, चित्रकला शिक्षक विजय तोरडकर, सुरक्षा रक्षक नागनाथ कोकाटे, शिपाई विक्रम काजळे आणि शेतीचे काम करणाऱ्या सुयश जोशी यांनी २ महिन्यांपासून शारीरिक अत्याचार केला. 

 

२ महिन्यांपासून शाळेतील काही कर्मचाऱ्यांकडून मुलीवर अत्याचार झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती.१६ जानेवारीला मुलीने आजीला अत्याचाराची माहिती दिली. आजीने ही माहिती संस्थेला सांगितल्यानंतर संस्थेच्या कृषी विद्यालयाच्या प्राचार्या गौरी कापरे यांनी मुलीला घेऊन लोहारा पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर गुरुवारी (दि.१७) पोलिसांनी हे प्रकरण समजून घेत इन कॅमेरा मुलीचा जबाब घेतला. 

 

पोस्कोअंतर्गत गुन्हा, एक जण फरार : 
तक्रार आल्यानंतर पोलिसांनी दत्ता जमदाडे, विजय तोरडकर, नागनाथ कोकाटे, विक्रम काजळे, सुयश जोशी, जयराम मोरे यांच्यावर भादंवि ३७६ तसेच पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यापैकी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. उस्मानाबाद कोर्टाने त्यांना ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. एक जण फरार आहे. 

 

पोलिसांना सहकार्य करणार 
चुकीच्या पध्दतीने वागणाऱ्या व्यक्तींना पोलिसांच्या स्वाधीन केले असून पुढील काळात तपासासाठी संस्था पोलिसांना सर्व सहकार्य करेल. प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने अधिक काही बोलता येणार नाही. शाळा कालपासून सुरळीत सुरू आहे. -अभिजीत कापरे, केंद्रप्रमुख, ज्ञानप्रबोधिनी, हराळी 
 
काकानेच केला होता पहिल्यांदा अत्याचार 
मुलीच्या वडिलांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झालेला आहे. आई भोळसर असून ती अनेक वर्षांपासून बेपत्ता आहे. त्यामुळे आजीने मुलीला ज्ञान प्रबोधिनीमध्ये शिकायला टाकले होते. २०१३ मध्ये ती उन्हाळी सुटीला मावशीकडे गेली. तिथे मावशीचा नवरा जयराम मोरेने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. यानंतर मावशीनेच हा प्रकार आजीला सांगून यापुढे आमच्या गावाला मुलीला पाठवू नकोस, असा सल्ला दिला होता. 

 

 

बातम्या आणखी आहेत...