आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या शेतमालाला चांगला भाव मिळावा म्हणून घरापासून 380 किमी लांब जात होते शेतकरी, पण काळाने मध्येच घातला घाला; एकाचवेळी पेटल्या 5 चिता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


शिवपुरी (मध्य प्रदेश) : गुरुवारी शिवपुरी येथे ओवा वाहून नेणारा ट्रक पलटल्याची घटना घडली. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. यातील सर्वजण शेतकरी होते. आपल्या शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी घरापासून 380 किमी दूर नीमच येथे जात होते. पण मध्येच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

 

जखमी झालेल्या युवकाने सांगितले दुर्घटनेचे कारण 

पोहरीपासून 6 किमी अंतरावर शिवपुरी-श्योपूर रस्त्यावर गुरुवारच्या रात्री ओव्याने भरलेल्या ट्रक पलटला. यामध्ये 5 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले आहे. दुर्घटनेत जखमी झालेल्या लाखन यादवने सांगितले की, गुरूवारी सायंकाळी 6 वाजता चकराना या गावी ट्रक आला. तेथे शेतकऱ्यांनी रात्री 8 वाजेपर्यंत आपला ओव्याचा माल ट्रकमध्ये भरला. ट्रकचालक न आल्यामुळे क्लीनर केशव धाकडने रात्री 9 वाजता पोहरी येथे ट्रक नेला.

 

पोहरी येथे ट्रकचा मालक आधीपासून नशेमध्ये होता. नशेतच तो ट्रक चालवण्यासाठी बसला. एक किमी लांब गेल्यानंतर चालकाने ट्रक अतिवेगाने चालविण्यास सुरुवात केली. तेवढ्यात सर्व लोकांनी विरोध करत ट्रक थांबविण्यास सांगितला आणि सकाळी जाण्याचे ठरवले. पण आता सावकाश ट्रक चालवतो असे सांगत ट्रकचालकाने काही अंतरापर्यंत सावकाश ट्रक चालवला. काही वेळातच त्याने ट्रकचा वेग पुन्हा वाढवला. वळणावर वेग कमी न केल्यामुळे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रकने पलटी मारली.

 

ट्रकमध्ये पाठीमागे बसलेल्या 5 शेतकऱ्यांचा पोत्याखाली दबल्यामुळे जागेवर मृत्यू झाला. तर क्लीनरसह 5 लोक जखमी झाले आहेत. ट्रकमध्ये पाठीमागे 12 ते 13 आणि कॅबिनमध्ये 6 ते 7 असे एकूण 18 ते 19 लोक होते. पोहरी पोलिस ठाण्यामध्ये सदर अपघाताची नोंद करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...