Home | National | Other State | 5 percent reservation for Gurjjars in Rajasthan today!

राजस्थानमध्ये गुर्जरांसाठी आज पाच टक्के आरक्षणाची घोषणा! 

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Feb 13, 2019, 09:20 AM IST

रेल्वे विभागाने तीन गाड्या रद्द केल्या, काही गाड्या वळवल्या 

 • 5 percent reservation for Gurjjars in Rajasthan today!

  जयपूर- शिक्षण व नोकरीत पाच टक्के आरक्षणाच्या मागणीसाठी गुर्जर आंदोलन पाचव्या दिवशीही सुरू होते. दुसरीकडे मंगळवारी राज्य सरकारने आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी दिवसभर बैठका घेतल्या. यामुळे गुर्जर आरक्षणासंदर्भात बुधवारी विधानसभेत मोठी घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. १० टक्के सवर्ण आरक्षणासह पाच टक्के गुर्जर आरक्षण जाहीर होण्याची शक्यता आहे. हा तोडगा घेऊन आयएएस नीरज पवन यांनी सवाई माधोपुरात गुर्जर आरक्षण संघर्ष समितीचे संयोजक कर्नल किरोड सिंह बैंसला यांची भेट घेतली. रात्री उशिरापर्यंत या विषयावर चर्चा सुरू होती. सवर्ण आरक्षण कायदा केंद्र सरकारने यापूर्वीच लागू केला आहे. परंतु राज्यात अजून तो लागू नाही.

  सीएमओत आधी कोअर कमिटी, नंतर कॅबिनेट बैठक
  गुर्जर आरक्षणासंदर्भात दुपारी कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात मुख्यमंत्री अशोक गहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट, विधानसभा अध्यक्ष डॉ.सी.पी. जोशी, मंत्री उदयलाल आंजनासह गुर्जर आमदार जितेंद्र सिंह, अशोक चांदना, शकुंतला रावत सहभागी झाले. त्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी कॅबिनेटची बैठक घेतली. त्यात गुर्जर आरक्षण व सवर्ण आरक्षणावर दोन तास चर्चा झाली. दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले गुर्जर आंदोलन मंगळवारी अधिक तीव्र झाले. आंदोलनकर्त्यांनी मंगळवारी महामार्ग बंद केला. मागण्या मान्य होईपर्यंत रेल्वे पटरीवरून उठण्यासही आंदोलनकर्त्यांनी नकार दिला. रेल्वे पटरीवर सुरू झालेले आंदोलन आता सीकर, दौसा, झुंझुनूं, बुंदी व टोंक भागापर्यंत पोहचले. दौसा जिल्ह्यातील आग्रा-जयपूर-बिकानेर, बुंदी जिल्ह्यातील नैवा, सवाई माधवपूरमधील मलाराना रस्ता आंदोलनकर्त्यांनी रोखून धरला. आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही. रेल्वे विभागाने तीन गाड्या रद्द केल्या असून दोन वळवल्या.

  आंदोलनकांनी रेल्वे पटरीवरच भगवान देवनारायण यांची जयंती केली साजरी
  रेल्वे पटरीवरच भगवान देवनारायण यांची जयंती साजरी केली.आंदोलनाचे संयोजक कर्नल किरोडीसिंह बैंसला व अन्य नेते या वेळी उपस्थित होते. सवाई माधोपूर जिल्ह्यात मलारना डुंगर भागात दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावर बसलेले बैंसल यांनी देवनारायण यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन केले. त्यानंतर प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली. या वेळी अॅड. शैलेंद्र सिंह, समितीचे विजय बैंसला उपस्थित होते.

Trending